श्री. हनुमान गणेश तरुणमंडळ येदूचामळा चोपडी येथे श्री गणेशाची स्थापना
आम. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व श्री.गणेशाच्या आरतीचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेल्या 10 लाख रुपये निधीतून येदुचामळा चोपडी येथे गणेश मंदिरासमोर उभारलेल्या सभामंडपाचे आम. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व श्री.गणेशाच्या आरतीचे आयोजन
सांगोला/ प्रतिनिधी:( दशरथ बाबर) सांगोला तालुक्यातील चोपडी येथील येदूचामळा येथे श्री. हनुमान गणेश तरुण मंडळाच्या वतीने सन 1989 पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
गणेश उत्सवास 35 वर्षाची परंपरा लाभली आहे. गणेश उत्सवानिमित्त स्थापनेपासून गणेश विसर्जन कार्यक्रमापर्यंत दररोज सात दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमासाठी शेकडो भाविकभक्त उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतात. गणेश उत्सवानिमित्त सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात .
आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून गणेश मंदिराच्यासमोर सभा मंडपासाठी 10 लाख रुपयांचा निधी दिला आहे .मंडळाने 10 लाख रुपये व आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून मिळालेले
दहा लाख असा एकूण 20 लाख रुपये खर्च करून गणेश मंदिरासमोर मोठा सभामंडप तयार केला आहे. सन 2012 साली.येदूचामळा येथे श्री गणेश मंदिराची उभारणी करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
गणेश उत्सवानिमित्त शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी आप्पासाहेब जयवंत बाबर यांच्या कुटुंबीयांकडून श्री गणेशाची स्थापना व आरती करण्यात आली. यावेळी मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ भाविक भक्त, व महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चौकट: सांगोला तालुक्याचे कर्तुत्ववान लोकप्रिय आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून प्राप्त झालेल्या 10 लाख रुपये निधीतून सांगोला तालुक्यातील चोपडी येथील येदूचामळा येथे गणेश मंदिरासमोर,
भव्य असा सभामंडप उभारण्यात आला आहे. सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन व श्री गणेशाची आरती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री हनुमान गणेश तरुण मंडळ येदुचामळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments