चिणके येथील कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा
माजी उपसरपंच पांडुरंग भानुदास मिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
(नाझरे प्रतिनिधी शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
चिणके ता सांगोला येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा माजी उपसरपंच पांडुरंग भानुदास मिसाळ यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्षे होते
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, चार भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. आमदार अॅड.शहाजीबापू पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते.
ते शिवसेनेचे जिल्हा संघटक म्हण्ाून काम पहात होते. पांडुरंग मिसाळ हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने चिणके गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर चिणके येथील माणनदी काठी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या तिसर्या दिवसाचा विधी बुधवार दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
0 Comments