खळबळजनक...नाझरे पोलीस बिट च्या आशीर्वादामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट;
पोलीस प्रशासनाचे हाताची घडी तोंडावर बोटची भुमिका
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाझरे बिट मध्ये पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे बेकायदेशीर दारू विक्री, जुगार मटका यासारख्या अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट झाला
असुन या संदर्भात मात्र पोलीस प्रशासनाकडून हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी सर्वसामान्य जनतेमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाझरे बिट मधील अनेक गावातील ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात लेखी निवेदन देवुन येथील
अवैध धंद्यावर अंकुश आणण्याबाबत बाबत पोलीस प्रशासनाकडे मागणी केली जाते परंतु पोलीस प्रशासन तेवढ्यापुरतीच कारवाई जात
असल्यामुळे पुन्हा जैसी थी परिस्थिती होत असल्यामुळे त्यामुळे बेकायदेशीर दारू विक्री व जुगार मटका चालकांना नेमका कोणाचा वरदहस्त लाभतोय याबाबत उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे.
पोलीस कारवाईनंतर हे धंदे बंद होण्याऐवजी पुन्हा जोमाने सुरू होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
या बीट मधील अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता दिसून येत नाही त्यामुळे दारू, जुगार, मटका खुलेआम सुरू असून त्यामुळे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे
तरी पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीर होत असलेली अवैध धंद्यांना लगाम घालावा अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांकडून केली जात आहे. फोटो संग्रहित छायाचित्र
नाझरे दूरक्षेत्र हद्दीतील अजनाळे गावातील बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्यासंदर्भात अजनाळे ग्रामपंचायत यांच्यावतीने दारू विक्री बंद करण्यासंदर्भात ठराव देऊन देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली
जात नसल्याने या बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना अभय कोणाचे? अशी चर्चा गावातील ग्रामस्थांमधून केली जात आहे तरी पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करावी
विष्णू देशमुख (मालक)
युवा नेते अजनाळे
0 Comments