धक्कादायक.. विजेचा शॉक लागून औषध विक्रेत्या तरुणाचा मृत्यू सांगोल्यातील घटना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - विजेचा शॉक लागून औषध विक्रेत्या तरुणाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना
सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौकातील गाळ्यात घडली.
सुधीर अरविंद येलपले वय ३५ सांगोला असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सुधीर येलपले याच्या आकस्मित अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुधीर येलपले यांचे महात्मा फुले चौक येथे औषध दुकान आहे. सोमवारी सांगोला शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता त्यात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाने वीजही गेली होती.
दरम्यान सुधीर येलपले हे सोमवार दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दुकानातील इन्व्हर्टर बॅटरी काढत असताना वीजेचा शॉक लागल्याने त्यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
0 Comments