पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..
राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत महाराष्ट्र राज्य मेडिया प्रमुख शब्दरेखा एक्सप्रेस संपादक
मा. संतोष साठे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पंढरपूर :- महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार या विभागात नोंदणीकृत असलेल्या पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा
आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ राज्यस्तरीय अधिवेशन पुरस्कार व कार्यशाळा वितरण व कार्यशाळा सोहळा” पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
राज्यस्तरीय अधिवेशन पुरस्कार व कार्यशाळा वितरण सोहळयात विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
यामध्ये मां.संतोष लक्ष्मण साठे यांना या राज्यस्तरीय अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा व कार्यशाळा पुरस्कार वितरण सोहळयात देण्यात आलेला “ आदर्श पत्रकार पुरस्कार ” २०२४ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे .
मा.संतोष लक्ष्मण साठे यांना पत्रकार व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा “आदर्श पत्रकार पुरस्कार” २०२४ हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार जाहीर झाला
असल्याची माहिती पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ .समनाथ जऱ्हाड यांच्या कडून निवड पुरस्कार देण्यात आला. पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या निवड समितीने संतोष लक्ष्मण साठे यांची निवड या पुरस्कारासाठी केली होती .
तसेच याच पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावरती ते आदर्श पत्रकार पुरस्कार मानकरी म्हणून उपस्थित होते . पत्रकार व डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे. तसेच ते डिजिटल इंडिया युट्युब प्रेस मिडिया या क्षेत्रामध्येही प्रसिद्ध आहेत.
या राज्यस्तरीय अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा व कार्यशाळा पुरस्कार वितरण सोहळयात , , पत्रकारिता, विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग शिखर गाठलेल्या, पैशाला महत्त्व आलेल्या जगात जनसेवेचे व्रत घेतलेल्या
व त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व सेवेसाठी आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या सन्मान मूर्तींना विविध क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. उदात्त हेतूने निस्वार्थीपणे कार्य करणारी माणसे, दखल घेतल्या
न गेलेल्या अव्याहतपणे राबणाऱ्या अदृश्य हातांना सन्मानित करून पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम पुरस्काराच्या निमित्ताने पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संस्था करणार आहे. हा या संस्थेचा या पाठीमागचा उदात्त हेतू आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब तसेच नगरचे प्लेसमेंट अधिकारी शेळके साहेब पत्रकार सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथजी जराड साहेब
पत्रकार सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष संभाजी साठे पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ गायकवाड उपाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे पंढरपूर मंगळवेढा चे विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे
सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख उत्तर महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू दक्षिण महाराष्ट्राचे नारायण ढेबे सर त्यांचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू सोलापूर जिल्हाध्यक्ष संग्राम कांबळे यांचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बंधू
पश्चिम महाराष्ट्र विभागाचे विजयकुमार लोंढे व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष संग्राम कांबळे यांनी केले व सूत्रसंचालक म्हणून पत्रकार सेवा संघाचे युवा संघटक सुरेश कोलगे यांनी केले
यांची पत्रकाराता व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप फेटा,
श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, देऊन. या पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक, ग्रामस्थ, व मित्र परिवार यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत व त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे .
सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे उपस्थितीत वार गुरुवारी दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी न्युज सातारा भक्त निवास/स्वंयंवर मंगल कार्यालय पंढरपूर या ठिकाणी पार पडली आहे .



0 Comments