स्वातंत्र्यदिनी सांगोला तहसील कार्यालयासमोर जातपंचायतच्या विरोधात लक्ष्मण घनसरवाड उपोषण करणार.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
जातपंचायत कायद्याने बंद केली असताना काही गुंड प्रवृत्तीचे लोक चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालतात आशा लोकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून या आंदोलनास बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी पाठिंबा दिला आहे
सांगोला येथील स्मशानभूमीमध्ये लक्ष्मण घनसरवाड गेली सात ते आठ वर्ष सांगोला स्मशान भूमीमध्ये कुटुंबीयांसमवेत राहात असून सांगोला शहरांमध्ये प्रामाणिकपणे अनेक धर्माच्या लोकांचा शेवटचा विधी पार पाडतो.
कोरोना सारख्या महाभयंकर साथीमध्ये त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी जीव धोक्यामध्ये घालून अनेकांचा शेवटचा विधी केला आहे. हे करत असताना सामाजिक स्तरावर पुरोगामी, समतावादी विचारधारा समाजामध्ये पसरवत असताना काही विघ्नसंतोषी,
समाजविघातक लोक जातपंचायतच्या नावाखाली त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गोळ्या घालून ठार मारतो व आंबेडकरी विचारधारा समाजामध्ये पसरवतो म्हणून तुला जातपंचायतच्या नावाखाली तुला बहिष्कृत करतो.
असा काही समाजकंटक नराधम औलादीच्या लोकांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक शारीरिक त्रास देऊन सांगोला व आदेगाव येथे धमकावले आहे.
जातपंचायत ही प्रथा कायद्याने कायमची बंद केलेली असूनही काही लोक त्यांना गोळ्या घालून ठार मारतो अशा धमकी देत आहेत.
संबंधित लोक गुंड प्रवृत्तीचे असून मला व माझ्या कुटुंबीयास त्यांच्यापासून धोका आहे तरी या प्रवृत्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई करून मला न्याय द्यावा
या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसणार असल्याची माहिती लक्ष्मण घनसरवाड यांनी दिली.
0 Comments