धक्कादायक घटना! प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा; मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे; नेमकं काय आहे प्रकरण?
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना पनवेल येथील खांदा कॉलनीत उघडकीस आली. विष्णू गवळी (रा.पनवेल, मूळ गाव गोणेवाडी ता.मंगळवेढा) असे मरण पावलेल्या पतीचे नाव आहे.
याप्रकरणी पत्नी अश्विनी गवळी (३७), समीर मोहन ठाकरे (२६) या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पत्नी व चालक यांच्यात संबंध होते. त्यांना पतीने विरोध केला असता पत्नीने पतीच्या नावावर
असलेली प्रॉपर्टी मिळण्याच्या हेतूने प्रियकराशी संगनमत करून पतीचा राहत्या घरात गळा दाबून जिवे मारल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
याप्रकरणी पत्नी व चालक समीर ठाकरे याला न्यायालयासमोर अटक करून उभे केले असता २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
विष्णू यांचे भाऊ शिवाजी यांनी शनिवारी मध्यरात्री पोलीसांना दिलेल्या तक्रारीनंतर खांदेश्वर पोलीसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.
विष्णू गवळी हे खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ९ येथील पीएल ५ टाईपमधील सिद्धिविनायक इमारतीमध्ये कुटुंबासोबत राहत होते.
विष्णू यांची ३७ वर्षीय पत्नी अश्विनी व त्यांचा २६ वर्षीय वाहनचालक समीर ठाकरे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते.
याबाबत विष्णू यांना समजल्यावर त्यांनी अश्विनी व समीर यांच्या भेटीला विरोध सुरु केला. विष्णू यांची होणारी अडचण टाळण्यासाठी
आणि विष्णू यांच्या मृत्यूपश्चात अश्विनीला मिळणाऱ्या संपत्तीमुळे या दोघांनी विष्णू यांची हत्या केल्याचे पोलीसांच्या तक्रारीत म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विष्णू हे ओळखले जात. तसेच अंदमान पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाचे ते काम करीत असून ते अनेक वर्षे वीर सावकरांच्या विचारांचे प्रचारक होते.
सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये ते स्वतःची ओळख लपवून गुप्तहेर म्हणून करत असत. त्यांच्या हत्येच्या बातमीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments