राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी लावलेली झाडे ही शहराला सुंदर करण्यात
अतिशय उपयुक्त ठरेल भविष्य याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही- माजी जि.प.अध्यक्षा जयमलाताई गायकवाड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सामाजिक कार्यकर्ते मोहसीन तांबोळी यांच्या पुढाकारातून स्वतंत्र दिनी सांगोला शहरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन अब्दुलसत्तार तांबोळी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून
सांगोला शहर हद्दीच्या मुख्य रस्त्यावर नगरपालिका कार्यालय ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत रस्ता दुभाजकामध्ये भारतीय स्वतंत्र दिनीच्या निमित्ताने सांगोला तालुक्याचे आमदार अॅड.शहाजीबापू पाटील,
माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेतभैय्या देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.जयमालाताई गायकवाड,
माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, माजी नगराध्यक्ष सुहास होनराव, शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, माजी नगरसेवक ज्येष्ठ पत्रकार नागेश जोशी,
माजी नगरसेवक अस्मीर तांबोळी, माजी नगरसेवक माऊली तेली, माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, माजी नगरसेवक अरुण काळे,
सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, शिवसेनेचे युवा नेते समीर पाटील, नगरपरिषदेचे आरिफभाई मुलाणी, ओंकार उकळे, उद्योगपती साजित तांबोळी, प्रसाद जिरगे, वैभव बनसोडे, हणमंत कोळवले(सर),
डॉ.दादासाहेब जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाडे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला. सांगोला नगरपरिषद कार्यालयास मोहसीन तांबोळी यांनी जवळपास 15 ते 17 फुटी उंचीची फॉक्सटेल पाम या जातीचे झाडे देण्यात आली.
सदर झाडे जोपासण्याचे व वाढवण्याचे जबाबदारी सांगोला नगरपरिषद यांनी घेतली आहे. आजच्या काळात पर्यावरणाचा र्हास होत असल्याने वृक्ष लागवडीची नितांत गरज असल्याने व सांगोल्याच्या सौंदर्यात वृक्ष लागवडीने भर पडणार
असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व ओळखून सामाजिक कार्यकर्ते मोहसिन तांबोळी यांनी स्वतः पुढाकार घेऊन व निसर्गाच्या सौंदर्यात भर घालणारी वृक्ष लागवडीची तयार रोपे नगरपालिकेला घेऊन नगरपालिका च्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम घडवून
आणून सामाजिक स्तुत्य उपक्रम धाडसाने राबवून वृक्ष लागवडीचे महत्त्व जनतेला पटवून दिल्याबद्दल उपलब्ध सर्वच मान्यवर नेत्याने त्यांचे सामाजिक कार्याचे खर्या अर्थाने कौतुक करून स्वतंत्र दिनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले.
सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार व वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसीन तांबोळी यांचे मित्रपरिवार व सांगोला नगर परिषदेचे कर्मचारी याने विशेष परिश्रम घेतले आहे त्यांचे मोहसीन तांबोळी यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments