मोठी बातमी.. शिवसेनेच्या शिवसर्व्हेक्षण अभियानात दडलंय काय? अंबादास दानवे घेणार सोलापूरचा आढावा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षाकडून जोमाने सुरू आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीने यात्रा, मेळावे, सर्वेक्षण, विभागीय मेळावे आदींच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात शिवसर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
त्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या (ता. 17 ऑगस्ट) सोलापूर जिल्हा आणि शहरात येत आहेत. सोलापूरच्या शिवसर्व्हेक्षण अहवालात नेमकं काय आहे, याची उत्सुकता असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसर्व्हेक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
त्या अभियानाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
या सर्व्हेक्षणात पक्षाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण किती, प्रतिकूल परिस्थिती कोणत्या मतदारसंघात आहे, याची चाचपणी केली जाणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा दानवे घेणार आहेत.
मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीसंदर्भात, महाविकास आघाडीत सुटू शकणारे संभाव्य मतदारसंघ याचीही चाचपणी या वेळी दानवे करण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्या सकाळी सहा वाजता सोलापुरात रेल्वेने येणार आहेत. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबून ते सकाळी साडेदहाला पंढरपूरमध्ये पंढरपूर,
सांगोला, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत.
करमाळा, माढा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घेणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत दुपारी दीड वाजता अंबादास दानवे हे पंढरपूरमध्ये चर्चा करणार आहेत.
मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी चारच्या सुमारास मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत दानवे बैठक घेणार आहेत.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात
सायंकाळी सहा वाजता चर्चा करणार आहेत. या मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा आढावा ते घेतील. त्यानंतर रात्री आठनंतर ते तुळजापूरला जाणार आहेत.
0 Comments