माणदेशी रत्नातील माणदेशी माणसानी हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून माण हरित क्रांतीने, सुजलाम सुफलाम करून
देशभक्ती रुजवावी - मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम चला सावली पेरूया याचे उद्घाटन संपन्न
नाझरे प्रतिनिधी (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
माणदेशी माणसाने देशाबद्दल असलेली भक्ती मनात ठेवून हर घर तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून, माणदेश हरितक्रांतीने सुजलाम, सुफलाम करून देशभक्ती रुजवावी
व माण देशाची अस्मिता जपावी असे मत सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी श्रीराम मल्टीपर्पज हॉल बलवडी,
माडगूळे येथे व्यक्त केले. जि.प. सांगली व जि.प. सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा, मॅरेथॉन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सर हद्दीवर श्रीराम मल्टीपर्पज हॉल मध्ये करण्यात आले होते.
सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत जि.प. शाळा गळवेवाडी शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. माणदेश हा भाग मोठा असून येथील माणूस कणखर आहे
व तो जो काम घेतो तो पूर्णपणे हिरीरीने करतो म्हणजे *"माणदेश माझा दांडगा, जसा बाजरीच्या भाकरीवर विकासाचा, हिरवळीचा व गुणवत्तेचा सांडगा"* याप्रमाणे मानदेश आहे
असे कौतुक ही तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी यावेळी केले. यावेळी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली व
संकल्पनेनुसार जि.प. सांगली व जि.प. सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम व तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे पूर्व बाजूने बलवडी हायस्कूल व पश्चिम बाजूने गदिमा हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर मॅरेथॉन रॅली काढून प्रचंड उत्साहात स्वागत केले.
यावेळी सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महत्त्वकांक्षी उपक्रम चला सावली पेरूया याचे कृषी विस्तार अधिकारी सिद्धनाथ काळेल
यांनी प्रात्यक्षिक आधारे उद्घाटन केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात जि.प. शाळा बालेवाडी आटपाडी गजी नृत्य, बलवडी कन्या प्रशाला देशभक्तीपर गीत व शेतकरी गीत,
बलवडी हायस्कूल शेतकरी गीत व देशभक्तीपर गीत, वत्सला देवी गर्ल्स हायस्कूल आटपाडी रेकॉर्ड डान्स, जि प शाळा बलवडी यांचे देशभक्तीपर गीत, भवानी हायस्कूल आटपाडी पोवाडा, जि.प. शाळा साठे नगर आटपाडी ची गवळण.
बाई पिचली माझी बांगडी या गाण्यावर सिद्धी लांडगे व इतर विद्यार्थ्यांचा 30 ते 35 महापुरुषांचे वेशभूषा व शोभा यात्रेचे आयोजन पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी समग्र शिक्षा आटपाडीचे प्रशांत चंदनशिवे सर यांनी सर्वांना तिरंगा शपथ दिली. तसेच तृप्ती धोडमिसे मॅडम व मनीषा आव्हाळे मॅडम, गटविकास अधिकारी योगेश कदम,
गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे व ईशाधिन शेळकंदे, पत्रकार रविराज शेटे यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
सदर प्रसंगी जि.प. सदस्य दादासो बाबर, सरपंच संगीता गवळी, माऊली राऊत, श्रीमंत सरगर, उपसरपंच रविराज शिंदे, सुवर्णा पाटील, डॉक्टर विजय सरगर, गट विकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे,
सुयोग नवले, विस्तार अधिकारी अमोल भंडारी, अशोक म्हेत्रे, जगन्नाथ कोळपे, केंद्रप्रमुख सय्यद अहमद काझी, आप्पासो पवार, दिनकर गाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी सचिन भोसले,
चांगदेव तात्या शिंदे, मुख्याध्यापक संभाजी शिंदे, मनोहर पवार, रुक्मिणी कोडग, एस. टी. पाटील, श्रीकांत कुंभार, सर्व शिक्षक, ग्रामसेवक धीरज मोरे, केडी कदम, प्रदीप लोहार, मिसाळ भाऊसाहेब,
अंगणवाडी शिक्षिका, सेविका, प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी अधिकारी, आटपाडी तालुका क्रीडा समन्वयक श्रीरंग वायदंडे, स्मिता मोटे, सांख्यिकी अधिकारी संतोष कदम, शोभा गळवे, आशा विभुते,
वासंती मुळीक, सचिन हेगडे, सलीम मुलानी, समाधान ऐवळे, ललिता पावणे, विद्या सपाटे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बाळासाहेब खुळपे,मा. अध्यक्ष विकास पवार ,शरद दीक्षित सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, इंजिनीयर बाळासाहेब नकाते, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जि.प. शाळा पांढरेवाडी चे शिक्षक प्रमोद देठे यांच्या रांगोळीचे सर्वत्र कौतुक केले जात होते. सूत्रसंचालन विशेषतज्ञ संतोष ऐवळे व शिक्षिका साधना चव्हाण यांनी सुंदरतेने केले तर आभार सांगोल्याचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी मानले.
*__________________________*
*भारत देश हा महान व मोठा असून, आपली संस्कृती व परंपरा मोठी आहे व या कार्यक्रमातून हे दिसून येत आहे व त्यामुळे सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तर सर्वांनी देशाची संस्कृती जोपासा.*
- *मनीषा आव्हाळे मॅडम*
(मुख्य कार्यकारी अधिकारी,सोलापूर)
*__________________________*
0 Comments