google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळेगाव फळवणी येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चार तोळे दागिने लंपास

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळेगाव फळवणी येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चार तोळे दागिने लंपास

सांगोला तालुक्यातील कोळेगाव फळवणी येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चार तोळे दागिने लंपास


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

अकलूज-सांगोला रस्त्यावर असलेल्या

• वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत कोळेगांव व फळवणी येथे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री १२ ते सोमवारी पहाटे ५ वा.च्या सुमारास 

घराम मध्ये घुसून व घराच्या बाहेर वरांड्यात झोपलेल्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण - डोरले आदी प्रकारचे सोने कात्रीच्या सह्याने - कट करून 

महिला झोपी गेल्याचे बघून चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कोळेगांव येथील सतिश पारसे

यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद - केला आहे. सतिश पारसे यांचे कोळेगांव येथे आई, वडील, पत्नी, भाचा असे सहकुटुंब राहणेस - असून दि.४ ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे रात्री - १०. वा. जेवनखान करून सर्व सदस्य झोपले असता

 वरांड्यात झोपलेले वयोवृद्ध आई- वडील यांना झोपेमुळे काहीही समजायच्या आत अज्ञात चोरट्यांनी आईच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे किमतीचे गंठण व डोरले कात्रीच्या सहाय्याने कट करून चोरी करून नेले आहे.

तसेच फळवणी ता माळशिरस येथील शिवराज प्रताप आवताडे यांची आई निर्मला आवताडे व नागनाथ चांगदेव आवताडे यांची पत्नी सुमित्रा आवताडे यांचे देखील सोन्याचे दागीणे चोरून अंदाजे ३ ते ४ तोळे किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.

एकाच रात्री कोळेगांव व फळवणी येथील चार ते पाच कुटुंबामध्ये चोरट्याने चोरीचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे दिसून येत असून फळवणी

 ग्रामपंचायतच्या वतीने बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये चार चोरटे असल्याचे दिसून येत असून या फुटेज मुळे तपास करण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments