लढायचं की पाडायचं ते 29 ऑगस्टला ठरवू;
सोलापुरातील शांतता रॅलीमधून मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
सोलापुरात भर पावसात सभा, काही लोकं सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी भिजू जरांगे पाटील यांची पवारांवर टीका; तर यांचा राजकीय सुफडा साफ करू दिला इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात जाहीर सभा घेतली.
या सभेत बोलताना त्यांनी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, कोकणातला एक जण भिताडाकडंच बघतंय.
भांडण लावता. मराठवाड्यात आला तर तु काहीच बघु शकत नाही कारण मी कपडे घातलेत. याच्या नंतर तु माझ्या नादी लागू नको
नाहीतर मी पिसाळलो तर खुप आवघड होईल. मी अडाणी आहे, पण कसे मुंडके भादरले. पाडायचे का सगळे, हे सांगा. मग 29 तारखेला या अंतरवालीमध्ये तेथे ठरवू. असं ते म्हणाले.
छगन भुजबळांवर टीका
छगन भुजबळ आज काल दिसत नाही. छगन भुजबळला जो नेता ज्या मतदारसंघात घेऊन जाईल तो नेता पाडायचा. छगन भुजबळला जे घेऊन येतील त्या मतदारसंघात त्याला पडायचे. आता नावे घेवुन कार्यक्रम लावयचा. आता नाव घेऊन पडायचे.
मराठ्यांना खेटल्यावर काय होते. मराठ्यांच्या नादाला लागला तर राज्यात तुमचा सुपडा साफ होईल. आम्ही तुमच्या कधी दारात आलो नाही, कधी बोललो नाही, पण एक लक्षात असुद्या नादाला लागाल तर राजकीय सुफडा साफ करू.
तू कोण 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा. फडवणीस यांना का बोलतो याचे कारण म्हणजे अंतरवाली मध्ये माता महिलांवर गोळ्या झाडल्या होत्या. तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने बोलला नाही.
तुम्हाला वाटते तुमचा पक्ष, नेता मोठा झाला पाहिजे, पण आम्हाला वाटते आमची जात मोठी झाली पाहिजे. खानदानी मराठा आता पक्षाचा प्रचार करणार नाही. सहाही पक्ष सांगत आहे.
शरद पवारांवर टीका
मी म्हणतो मुंबई नको पण, मराठ्यांची पोर म्हणतात मुंबई चला. मराठ्यांची शान कधीच जाऊ देणार नाही. मला वाटले असते तर मी म्हणालो असतो याला धाराशिवच्या बाहेर जाऊ देऊ नका. काही जण पावसात निवडून येण्यासाठी भिजतात.
आपण जातीसाठी भिजू. विधानसभेला आपला माणूस देताना एकच माणुस द्या. समाज जो ठरवेल त्याच्या बाजूने उभे रहा. मराठ्यांनो फक्त एकोप्याने राहा. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.
सरकारने अभियान सुरू केले आहे, मराठे समन्वयक फोडायला सुरवात केली आहे. फडवणीस आणि दरेकर यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले आहेत.
पण आपण गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळावर लावून घेऊ नका. एका क्रांती मोर्च्याचे यांनी तीन मोर्चे केले. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांनी कष्ट करणाऱ्या मराठ्यांची जाण ठेवा.
मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांनी शहाणे व्हावे. माझ्या मराठ्यांनी खुप लोकांना सांभाळले,आणि तेच बेईमान झाले. 100 टक्के आरक्षण मिळवून देतो,
मुंबई जायची गरज नाही. सरकारने छगन भुजबळ यांच्या माध्यमातून तिसरे अभियान सुरू केले आहे. भुजबळ यांना देशातील बोगस समितीचे अध्यक्ष केले आहे. अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.



0 Comments