"चार्टर्ड अकाऊटंट परीक्षा (CA)२०२४ मध्ये सांगोल्यातील मजुराच्या मुलाचे दैदिप्यमान यश
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
नुकत्याच पार पडलेल्या चार्टर्ड अकाऊटंट परीक्षा २०२४ मध्ये सांगोला येथील मनेरी गल्ली येथील रहिवाशी एक मार्केट यार्ड मध्ये काम करणारा
मजूर जीलानी मणेरी यांचे चिरंजीव रैयान मणेरी यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सीए परीक्षेत यश संपादन केले.
२०१८ साली रैयान मणेरी यांनी *सीए. जुबेर मुजावर व सहारा एज्युकेशन अँड सोशल फाऊंडेशन* यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे सीए चे शिक्षण सुरू केले.
अत्यंत हालाखीची परिस्थिती असून न खचता २०२४ साली मे महिन्यामध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाले.
वडील जिलानी मनेरी यांचे कष्ट आणि शिवणकाम करणारी आईचे कष्ट आणि आशीर्वाद आणि मित्रमंडळीचा सपोर्ट यांच्या जोरावर रैयान ने अतिशय अवघड अशी परीक्षा सर केली.
शहरातील सर्व सामाजिक संघटना,सहारा एजुकेशन एंड सोशल फाउंडेशन
ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन सांगोला, मणेरी परिवार सांगोला समाज आणि मित्र मंडळाकडून सर्वत्र शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.


0 Comments