google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुरवठा - सेतू मान्यता नसलेले महा-ई-सेवा यांचा अनागोंदी कारभारत हसीलदार यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा ; तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबवा अन्यथा आंदोलन करू

Breaking News

पुरवठा - सेतू मान्यता नसलेले महा-ई-सेवा यांचा अनागोंदी कारभारत हसीलदार यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा ; तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबवा अन्यथा आंदोलन करू

पुरवठा - सेतू मान्यता नसलेले महा-ई-सेवा यांचा अनागोंदी कारभारत हसीलदार यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा ;


तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबवा अन्यथा आंदोलन करू  मा.सुरजदादा बनसोडे 

सांगोला:-सर्वर डाऊन च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची यामध्ये प्रामुख्याने महिलांचे आर्थिक बाजूने पिळवणूक केली जात आहे. 

कर्मचारी संबंधित नागरिकांना आर्वोच्च भाषा वापरून अपमानित करीत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकारी अर्थात तहसीलदार बघ्याची भूमिका घेत आहेत. 

सदरचा प्रकार थांबवता येत नसेल मा. जिल्हाधिकारी यांनी सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांची तात्काळ बदली करावी अन्यथा,

 तीव्र आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी दिला आहे.

    सांगोल्याचे महत्वाचे कार्यालय म्हणून समजल्या जाणाऱ्या तहसील कार्यालयामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. 

पुरवठा विभागातील ठेका पद्धतीवर असलेले कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्याचा आव आणून सामान्य नागरिकांची पिळवणूक करीत आहेत.

 एवढेच नव्हे तर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याशिवाय कोणतेही काम करीत

 नसल्यामुळे सामान्य लोकांनी आपली मागणी कोणाकडे सादर करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरला

 जात असल्याने यासाठी नाव वाढविणे व कमी करणे किंवा नवीन रेशन कार्ड काढणे यासाठी ग्रामीण भागातील नागरिक तहसील कार्यालयामध्ये दिवसभर ताटकळत उभे असतात. 

ऑनलाइन आणि सर्वर च्या नावाखाली येथील कर्मचारी त्यांना कार्यालयाबाहेर जाण्याचा सल्ला देतात. एवढेच नव्हे

 तर त्यांनी नेमून ठेवलेल्या झिरो कर्मचारी आणि शासकीय मान्यता नसलेल्या महा-ई-सेवा केंद्रात पाठवून तिथून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहेत. 

यामध्ये सेतू कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून यातून काही मलिदा वरिष्ठ अधिकारी म्हणजेच 

तहसीलदार यांच्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे यांना कोणत्याही पद्धतीचे भय राहिलेले नाही. कर्मचारी जेवढे सांगेल तेवढे पैसे दिले नाही तर काम होणार नाही

 अशी वागणूक तहसील कार्यालयात सुरू असून याकडे तहसीलदार यांचे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून याला लगाम लावण्यासाठी अर्थात येथील ठेका

 पद्धतीचे कर्मचारी यांना शासकीय नियमानुसार कामकाज करण्यासाठी व येथील काम करणारे झिरो कर्मचारी बाहेर काढण्यासाठी

 तहसीलदार यांनी प्रयत्न करावा अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments