google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ! आता सोलापुरातही भयंकर घटना तुला खल्लासच करून टाकतो असे म्हणत...

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ! आता सोलापुरातही भयंकर घटना तुला खल्लासच करून टाकतो असे म्हणत...

ब्रेकिंग न्यूज ! आता सोलापुरातही भयंकर घटना तुला खल्लासच करून टाकतो असे म्हणत...


 सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातील एका परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेवर वारंवार बळजबरीने शरीर संबंध करून अत्याचार केल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दाखल केली असून, तिच्या फिर्यादीवरून बालाजी सत्यनारायण नल्ला (रा.सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 या घटनेची हकीकत अशी की, पीडित महिलेच्या पतीच्या निधनानंतर पीडित महिलेचा पती याचा मित्र बालाजी नल्ला याने रात्री पीडित महिलेच्या घरी जाऊन पाऊस येऊ लागला आहे.

 दरवाजा उघडा असे म्हणत घरात घुसुन पीडित महिलेसोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करून या प्रकरणाबाबत कोणाला सांगितलं तर तू एकटी आहे. तुला खल्लास करून टाकतो असे म्हणत धमकी दिली.

 त्यानंतर पुन्हा नल्ला हा पीडित महिलेच्या घरी येऊन बळजबरीने शरीर संबंध करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments