बापरे धक्कादायक! सहा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून
पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून
सहा अल्पवयीन मुलांनी एका २८ वर्षीय तरुणाचा लाकडी दांडक्याने मारून खून केल्याची घटना घडली
आहे. भोसरी येथील शांतीनगर येथे काल रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली हआहे. किरण बाळू लेंढघर (वय-२८, रा. शांतीनगर, भोसरी)
असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल बाळू लेंढघर (वय-३२, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी आज भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी अल्पवीयन मुलांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण लेंढघर हे त्यांच्या घराजवळ उभे असताना
त्यांचा एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने किरण यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.
त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याच रागातून अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून किरण यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.
या मारहाणीनंतर किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
0 Comments