पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी स्विकारला मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार; 'हे' प्रश्न सोडवणे त्यांच्या समोर असणार आवाहन
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची बदली पंढरपूर येथील मंदिर सुरक्षा विभागाकडे झाली असून त्यांच्या जागेवर
तेथून पो.नि.महेश ढवाण हे रात्री उशीरा मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झाले असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
पो.नि.रणजीत माने यांनी आपला दोन वर्षाचा प्रशासकीय कालावधी पुर्ण केल्यानंतर त्यांना निवडणूकीच्या तोंडावर मुदतवाढ मिळाली होती.
माने यांनी कार्यभार घेतल्यानंतर तत्कालीन पो.नि.गुंजवटे यांच्या कारकिर्दीत पडलेल्या दरोड्यांचा तपास त्यांनी यशस्वीरित्या लावून दरोडेखोरांना जेरबंद केले होते.
नव्याने कार्यभार स्विकारलेले पो.नि.महेश ढवाण हे पंढरपूर मंदिर सुरक्षा विभागाकडे कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार रात्री उशीरा स्विकारला असून मागील दोन आठवड्यात चोर्यांचे प्रमाण भरदिवसा
वाढल्याने त्या चोर्यांचा तपास करणे व कारखाना रोडवरून होणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणे त्यांच्यापुढे एक आव्हान आहे. शहरात अवजड वाहने येवू नये
यासाठी पंढरपूर रोड व मरवडे रोड या दोन ठिकाणी उंच कमाणी बसवण्यात आल्या असतानाही शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहणे
जात येत असल्याने दामाजी चौकातून शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन रस्ते ओलांडावे लागत असल्याने नुतन पोलीस अधिकार्यांनी ही वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणी आहे.
सध्या मंगळवेढ्यात क्राईमचा आकडा वाढत चालल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे नवीन अधिकारी कितपत यशस्वी होतात? याकडे तमाम सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलीस ठाण्यात रात्री 9 वाजता पो.नि.रणजीत माने यांना निरोप तर नवीन आलेले पो.नि.महेश ढवाण यांचे स्वागत पोलीस कर्मचार्यांच्यावतीने करण्यात आले.
0 Comments