खळबळजनक घटना...'हे आईला कळू देऊ नका..';
पुण्यातील प्रशिक्षणार्थी महिला शिपायानं संपवलं आयुष्य
प्रशिक्षण केंद्रात एक खळबळजनक घटना घडली आहे. नागपुर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी
महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात लिहिले आहे
की, आपण आत्महत्या केल्याचे आईला सांगू नका. या घटनेमुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडाली आहे.
प्रतीक्षा भोसले असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचे नाव आहे. ती नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती. प्रतीक्षा मूळची पुणे जिल्ह्यातील होती.
तसेच ती विवाहित असल्याचे समजते. प्रतीक्षाने प्रशिक्षण केंद्राच्या वसतीगृहात असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायऱ्यांना गळफास घेत आत्महत्या केली.
यावर्षी फेब्रुवारीपासून ती नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती. प्रतीक्षा गेल्या काही दिवसापासून नैराश्येत असल्याचे म्हटले जात आहे.
या कौटुंबिक नैराश्यातूनच तिने आपले जीवन संपवले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रतीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की, मी आत्महत्या केल्याचे माझ्या आईला कळू देऊ नका. या चिठ्ठीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत.
0 Comments