google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ध्यानमंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा युवा नेते सागर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

Breaking News

सांगोला ध्यानमंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा युवा नेते सागर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

सांगोला ध्यानमंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा युवा नेते सागर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) वाढेगाव रस्ता ते ध्यानमंदिर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.

 सांगोला येथील वाढेगाव रोडवर असलेल्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ध्यान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती.

 या मागणीला यश आले असून या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ युवा नेते सागर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गुरुवारी करण्यात आला. 

आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना २२-२३ सांगोला नगरपालिका यामधून निधी दिलेला आहे. निधीतून हा रस्ता होत आहे. याप्रसंगी नामसाधना मंडळाच्या वतीने

 सागर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पी. व्ही. कांबळे, अच्युत फुले, राजू पाटील, गणेश दौंडे, विठ्ठल गोडसे, रविंद्र कदम, नीलकंठ शिंदे, 

सुकानंद हळळीसागर, विजय कुलकर्णी, अनिल घोंगडे, नंदू हरिदास, कुमार कांबळे, सतिश बिडकर, अनिल देशपांडे, राजेंद्र यादव, ठेकेदार मिसाळ व नामसाधक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments