ब्रेकिंग न्यूज..चित्रपटानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने सोलापूर जिल्ह्यात शाळा;
कुठे अन् कोणी घेतला निर्णय; नामांतर सोहळ्याचे सर्व मराठा खासदारांची उपस्थिती
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील
आणि मर्द मावळा शिवरायांचा वाघ हे चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मांडण्यात आली आहे.
आता मनोज जरांगे यांचे नाव शाळांनाही देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगे पाटील यांच नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
बार्शी तालुक्यातील मुंगशी (दहिटणे) येथे १९९८ मध्ये जय जगदंबा शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली.
आज त्या शाळेला आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला.
मुंगशी विद्यालय या शाळेचे नाव यापुढे मनोज जरांगे पाटील विद्यालय, मुंगशी (दहिटणे) ठेवण्यात येणार असून, या शाळेचे नामकरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच या कार्यक्रमास स्वराज संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
यासाठी महाराष्ट्रातील २६ मराठा खासदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके यांनी सांगितले आहे.
सध्या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालू असून, या शाळेत मुंगशी, दहिटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील दहावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम आहे.
मनोज जरांगे-पाटील यांचे नाव आमच्या दिल्याचा आम्हा ग्रामस्थांना याचा सार्थ अभिमान आहे, असे मुंगशीचे उपसरपंच आशिष क्षीरसागर म्हणाले.
मराठा समाजासाठी मोठे योगदान म्हणून निर्णय
मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाजासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात होणार आहे.
त्यामुळे आमच्या संस्थेच्या विद्यालयास त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. – डॉ. कपिल कोरके, अध्यक्ष, जय जगदंबा शिक्षण संस्था
0 Comments