खळबळजनक घटना...सांगोल्यात आरोग्यसेवकाची गळफास घेऊन आत्महत्या
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला: अज्ञात कारणावरून राहत्या घरातील बेडरूममधील पंख्याला साडीने गळफास घेऊन ४८ वर्षीय आरोग्यसेवकाने आत्महत्या केली.
ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वासूद रोड येथे घडली.
सचिन मोहन मस्के (४८, रा. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर) सध्या राहणार (वासूद रोड, सांगोला) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,
एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सचिन मस्के हे कुटुंबासह वासूद रोड, सांगोला येथे राहात होते. ते कहलास, ता. सांगोला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक पदावर कार्यरत होते.
दरम्यान, सोमवारी रात्री त्यांनी कुटुंबासमवेत घरी जेवण करून बेडरूम झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री त्यांच्या बेडरूममधून मांजर ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने नातेवाइकांनी दरवाजा ठोठावला.
परंतु, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मुलीने खिडकीतून बेडरूममध्ये डोकावले असता वडिलांनी पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आल्याने तिने आरडाओरडा केला.
भावाने दरवाजा तोडून सचिन यांना खाली उतरवले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचे सांगितले.
सचिन यांच्या मुलीने एमएचटी सीईटी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल रविवारी लागला होता.
मुलीला सीईटी परीक्षेत कमी मार्कस मिळाल्याने नैराश्यातून वडील सचिन मस्के यांनी आत्महत्या केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती,
0 Comments