google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याकरिता ग्राहकांचा तीव्र विरोध अशोक कामटे संघटनेने सोलापूर जिल्ह्यात केला या योजनेला विरोध

Breaking News

प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याकरिता ग्राहकांचा तीव्र विरोध अशोक कामटे संघटनेने सोलापूर जिल्ह्यात केला या योजनेला विरोध

प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याकरिता ग्राहकांचा तीव्र विरोध अशोक कामटे संघटनेने सोलापूर जिल्ह्यात केला या योजनेला विरोध 


सांगोला ( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


वीज महावितरणने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जुने वीज मीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने तीव्र विरोध केला आहे.

 या  मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, सोलापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील लाखो ग्राहकांचे वीज मीटर सक्तीने बदलले जाणार आहे. या योजनेतून महावितरणचे काम जरी सोपे होणार असले तरी ग्राहकांना रिचार्ज कराल तेवढीच वीज ग्राहकांना वापरता येईल ,

पैसे संपले की वीजपुरवठा आपोआप बंद होईल, मग सर्वसामान्य ग्राहकांचि गैरसोय ऐनवेळी या रिचार्जकरिता रक्कम कुठून उपलब्ध करायची ? पूर्वीच्या मीटरला ग्राहकांना जरी वीज बिल आले

 तरी भरण्याकरिता तीन-चार दिवस जरी विलंब लागला तरी विद्युत पुरवठा खंडित होत नव्हता, गैरसोय होत नव्हती. हा मोठा ग्राहकांना तोटा फटका योजना आली तर बसणार आहे.

महावितरणने ग्राहकांना अखंड पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सातत्याने करावा त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापासून शेतकरी ,व्यापारी ,ग्राहक (नागरिक)दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आर्थिक डबघाईला

 आलेला आहे या योजनेचा महावितरण कंपनी अप्रत्यक्षरीत्या ग्राहकांवर बोजा टाकणार आहे सद्य परिस्थितीत हे स्मार्ट मीटर बसवण्याची कोणतीच आवश्यकता नाही.

जिल्ह्यातील ग्राहकांचा तीव्र विरोध या योजनेस सदरची योजना तात्काळ रद्द करावी. योजना रद्द झाली नाही, या कामी महावितरणने सक्ती केली  तर अशोक कामटे संघटना

 जिल्ह्यातील वीज ग्राहकांसमवेत तीव्र आंदोलन करणार आहे. प्राधान्याने ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, 

आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ,कार्यकारी अभियंता पंढरपूर, उपकार्यकारी अभियंता म रा वि वि कंपनीकडे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

Post a Comment

0 Comments