google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू ; शेळ्याही दगावल्या

Breaking News

धक्कादायक..सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू ; शेळ्याही दगावल्या

धक्कादायक..सोलापुरात वीज पडून दोघांचा मृत्यू ; शेळ्याही दगावल्या


सोलापुरात शुक्रवारी जोरदार पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह हा पाऊस होता. शहराच्या जवळील वेगवेगळ्या दोन गावामध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

 एक व्यक्ती जखमी, तसेच दोन शेळ्या हि दगावल्या आहेत.दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळळी गावात वीज कोसळ्याने आमसिद्ध गायकवाड वय 67 यांचा मृत्यू झाला

 तसेच गायकवाड यांच्या दोन शेळ्या हि दगावल्या आहेत. कुंभारी गावात 'बिळेणी डक्के' या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू वीज पडल्यानेच झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली.

तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी राठोड यांना उपचारसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Post a Comment

0 Comments