मोठी बातमी.. डॉ.ऋचा रुपनर हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते
व प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना अटक
सांगोला /प्रतिनिधी ( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला येथील डॉक्टर ऋचा सुरज रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी सासरे उद्योगपती आणि शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर व सासू
सुरेखा रुपनर यांचे ही गुन्ह्यात नाव दाखल झाले असून त्याप्रकरणी उद्योगपती भाऊसाहेब आनंदा रुपनर यांना
कोल्हापूर येथे ताब्यात घेऊन सांगोल्यात रात्री उशिरा आणण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत अटकेची प्रक्रिया चालू होती
डॉक्टर ऋचा रुपनर हिने गुरुवारी सहा जून रोजी आत्महत्या केली होती त्यांचे शवविच्छेदन सांगोला येथे
नातेवाईकांनी करू दिले नसल्याने सोलापूर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले होते
त्यानंतर ऋचा हिच्यावर अंत्यसंस्कार माहेरी पंढरपूर येथेच करण्यात आले होते ऋचा हिला पती सुरज रुपनर हा पैशाची मागणी तसेच
व्याभिचारी असल्याचे कारणास्तव आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून डॉक्टर सुरज वर गुन्हा दाखल होऊन पाच दिवस होऊन निष्क्रिय
सांगोला पोलिसांनी दबावाने आरोपीला अटक केली नव्हती ऋचा यांचे सासरे शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते असून प्रसिद्ध उद्योगपती आहेत
सांगोल्याच्या पोलिसावर मुंबईवरून दबाव असल्याने आरोपी अटक होण्यास विलंब लागत होता
त्याबाबत सांगोला शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संघटना शांत होती
अखेर इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर शाखेचे शंभरहून अधिक डॉक्टर पंढरपूरहुन सांगोला येथे आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांना 24 तासात अटक करा
अन्यथा आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनमध्ये दिला होता सांगोला पोलिसांनी सदर घटनेबाबत
गांभीर्य न घेता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या हालचाली वरून दिसत होते त्याचवेळी तपासातील पुरवणीमध्ये
सासरे उद्योगपती भाऊसाहेब रुपनर व सासू सुरेखा रुपनर यांचे नाव दाखल केले आहे त्यांना त्वरित अटक करा या मागणीसाठी डॉक्टरनी
सांगोला पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन केले पोलिसांच्या निष्क्रिय बाबत घोषणा देऊन पोलीस स्टेशन दणाणून सोडले
सदर मेडिकल असोसिएशन मध्ये महिला डॉक्टरांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी
भाऊसाहेब रुपनर यांना कोल्हापूरहून सांगोल्याच्या पोलिसांनी आणले व त्यांच्यावर बरेच वेळ अटकेची प्रक्रिया चालू होती
आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया चालू झाल्याने पंढरपुरातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आपले पंढरपुरकडे रवाना झाले पंढरपूर येथील डॉक्टरांच्या आंदोलनामुळे आरोपीस
अटक झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे परंतु सांगोल येथील डॉक्टरनी पाठ का फिरवली याबाबत चर्चा होत आहे




0 Comments