google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे गलथान कारभाराचा जाहीर धिक्कार अशा घोषणा

Breaking News

सांगोल्यात संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे गलथान कारभाराचा जाहीर धिक्कार अशा घोषणा

सांगोल्यात संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे गलथान कारभाराचा जाहीर धिक्कार अशा घोषणा


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला उपशिक्षक देण्याबाबत वारंवार मागणी करून लेखी निवेदने देवून 

देखील टाळाटाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकले असल्याची घटना

 काल शाळा सुरू होण्यापूर्वीच 14 जून रोजी सांगोला येथे घडली. यावेळी संतप्त पालकांनी भिमनगर शाळेला कायम स्वरुपी

 शिक्षक दिलाच पाहिजे, गलथान कारभाराचा जाहीर धिक्कार अशा घोषणा दिल्या.

जि.प.प्राथमिक शाळा भिमनगर येथे उपशिक्षक देणेबाबत भिमनगर येथील प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती 

अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक यांच्यावतीने गटशिक्षणाधिकारी सांगोला यांना निवेदन दिले.

सध्या भिम नगर प्राथमिक शाळेची विद्यार्थी पट 70 असून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेत दोन शिक्षक आहेत.परंतु त्यापैकी एक शिक्षक वादग्रस्त असून त्यांच्या विरोधात

 भिमनगर येथील पालक व समाज बांधवांनी अनेक वेळा अनेक तक्रारी केल्या आहेत. शाळेतील सर्व पालक मोल मजुरी करून आपल्या पाल्यास जिल्हा परिषद शाळेत पाठवतात 

तरीही जाणीवपूर्वक शाळेकडे कानाडोळा केला जात असेल तर सर्व पालकांना भविष्यकाळात या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावे लागेल.असा इशारा निवेदनाव्दारे पालकांनी दिला आहे.

सदर निवेदनावर बापूसाहेब ठोकळे, विजय वाघमारे, मंजुषा बनसोडे, कोमल ठोकळे , नंदा बनसोडे, संगीता गडहिरे, सुरेखा रणदिवे, विजया बनसोडे, 

सविता धांडोरे, तनिषा थॉमस, आरती धांडोरे, ज्योती बनसोडे, लता चंदनशिवे, अनिता काटे, अक्षता काटे या पालकांच्या स्वाक्षरी आहेत

गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकार्‍यांनी तात्पुरत्या स्वरुपात आज 15 जून पासून एक शिक्षक शाळेस दिला आहे.18 ते 25 जुन रोजी जिल्हाअंतर्गत बदल्या होणार आहेत. 

त्यामध्ये पुर्ण वेळ शिक्षक दिला जाईल असे आश्वासन संबंधीत विभागप्रमुखांनी आम्हाला दिले आहे.

लवकरात लवकरात जर पूर्ण वेळ शिक्षक दिला नाही तर भविष्य काळामध्ये विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांना घेऊन मोठे आंदोलन छेडले जाईल.

बापूसाहेब ठोकळे

Post a Comment

0 Comments