चिंचोली ब्रिजवर अपघात चालकासह पाच महिला जखमी
देवदर्शनानंतर भाविकांची कार उलटली अन् एअरबॅग उघडल्याने दुर्घटना टळली
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला भाविकांची भरधाव कार उलटून झालेल्या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली; तर चालकासह चौघेजण किरकोळ जखमी झाले.
कार उलटल्यानंतर एअरबॅग उघडल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले.
हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावर चिंचोली ब्रिजवर घडला.
पूनम अजित आंबले, अजित रघुनाथ आंबले, भूमी अजित आंबले, प्रथम अजित आंवले, वैष्णवी साईराज आंबले (सर्वजण रा. चिखली, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.
सोलापूर-सांगली महामार्गावर चिंचोली बिजवर उलटलेल्या कारची अशी अवस्था झाली.
चिखली येथील अजित आंवले हे कुटुंबासह कार (एमएच ०९ / एफक्यू ८८३३) मधून अक्कलकोट आणि तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनानंतरपरत सांगोलामार्गे चिखली (कोल्हापूर) कडे निघाले होते.
चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने सांगोला चिंचोली ब्रिजवर कार उलटली. कार उलटताच एअरबॅगा उघडल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
मात्र पूनम आंवले यांच्या डाव्या डोळ्याला व गुडघ्याला गंभीर मारा लागल्याने त्या जखमी झाल्या. इतरांना किरकोळ मार लागला. महामागी पोलिसांनी त्यांना अपघातग्रस्ता कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
शहरा बिटचे हेड कॉन्स्टेबल नागनाथा वाकीटोळ यांनी अपघातग्रस्त कास बाजूला करून वाहतूक सुरळीत केली याबाबत रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद झालेली नव्हती.
0 Comments