google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेत केली तब्येतीची विचारपूस

Breaking News

शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेत केली तब्येतीची विचारपूस

मोठी बातमी... शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेत केली तब्येतीची विचारपूस


सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन

 त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली.तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. 

याशिवाय त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली. शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली

 तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळगाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांची फोनवरून चौकशी केली होती. 

दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांना खंबीरपणे साथ दिली होती. तसेच त्यांचा गुवाहाटीमधील ‘काय झाडी, काय डोंगार’ असे म्हणत

 असलेले ऑडिओ क्लिप देखील चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे त्यांना राज्यात चांगलीच ओळख मिळाली. तर विरोधकांनी यावरून त्यांच्यावर टीका देखील केली होती. 

शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळ गाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली होती. 

आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली.

 तसेच त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असून ती पुन्हा एकदा धडधडावी यासाठी बापुंनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ही तोफ बिछान्यावर पडून नव्हे

 तर भर सभेत विरोधकांना चारही मुंड्या चित करताना दिसायला हवी, यासाठी बापुनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कुटूंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments