google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३६० जणांचे रक्तदान डिजिटलमुक्त वाढदिवस साजरा, अनावश्यक खर्च टाळून गोशाळेतील जनावरांना चारा व पशुखाद्य वाटप

Breaking News

गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३६० जणांचे रक्तदान डिजिटलमुक्त वाढदिवस साजरा, अनावश्यक खर्च टाळून गोशाळेतील जनावरांना चारा व पशुखाद्य वाटप

गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३६० जणांचे रक्तदान डिजिटलमुक्त



वाढदिवस साजरा, अनावश्यक खर्च टाळून गोशाळेतील जनावरांना चारा व पशुखाद्य वाटप 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद

 देत व्यापक पातळीवर गरजू रुग्णांना तात्काळ रक्ताचा पुरवठा उपलब्ध होण्यासाठी युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या 

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३६० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच मित्रपरिवाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकही डिजिटल न लावता

 डिजिटलमुक्त वाढदिवस साजरा करून अनावश्यक खर्च टाळून बामणी व गोपाळपूर येथील गोशाळेतील जनावरांना चारा व पशुखाद्य वाटप करण्यात आले. 

       १५ जून रोजी युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी

 जोपासत सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला येथे सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन करण्यात आले होते. 

       या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी बागल, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, माजी नगरसेवक प्रा.संजय देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, 

युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे, उद्योजक बाळासाहेब आसबे, शिवसेनेचे शहराध्यक्ष समीर पाटील, विष्णुपंत केदार, संजय केदार,  सुरेश चौगुले, धीरज पवार, बबलू इंगोले, 

बबलू माने, अजय सुरवसे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात ३६० जणांनी रक्तदान केले. 

रक्तदान करणाऱ्यांना तसेच शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना वृक्ष भेट देण्यात आले. तर रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. 

      युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला येथील जिल्हा 

परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांना एक हजार वह्या व पेन वाटप करण्यात आले. तसेच मित्रपरिवाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे

 एकही डिजिटल न लावता डिजिटलमुक्त वाढदिवस साजरा करून अनावश्यक खर्च टाळून बामणी व गोपाळपूर येथील गोशाळेतील जनावरांना चारा व पशुखाद्य वाटप करण्यात आले.

 वाटंबरे येथे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यासाठी तसेच गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी आपुलकी प्रतिष्ठानला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 

तसेच वाढेगाव येथील रविराज कोरपे या तरुणास घर बांधण्यासाठी ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच मित्रपरिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments