google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने नुतन खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांचा सत्कार संपन्न.

Breaking News

जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने नुतन खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांचा सत्कार संपन्न.

जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने नुतन खासदार धैर्यशील  मोहिते- पाटील यांचा सत्कार संपन्न. 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेले 

विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांचा सत्कार जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर जिल्हा यांच्यावतीने करण्यात आला या सत्कारा प्रसंगी 

धनगर समाजाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बिरुदेव शिंगाडे, शिवसेना शहर प्रमुख तुषार इंगळे, लोकप्रिय पंचनामा न्यूज चे संपादक सुरज लवटे, रघुनाथ ऐवळे, रोहित मोहिते (अकलूज) आदी मान्यवर उपस्थित होते.

   या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना नुतन  खा. धैर्यशील मोहिते- पाटील म्हणाले की माझ्या विजयामध्ये सांगोलेकरांचा सिंहाचा वाटा आहे

 माझा विजयश्री खेचून आणण्यामध्ये रामोशी समाज, धनगर समाज बांधव यांच्यासह सर्वच जाती-धर्माच्या

 लोकांनी मोठे परिश्रम घेतले आहे यामुळे मी त्यांचा सदैव ऋणी राहीन व आगामी काळात देखील सांगोला तालुक्यावर माझे विशेष लक्ष राहणार आहे 

लवकरच तालुक्यातील अधिकाऱ्यांना समोर घेत आढावा बैठक घेणार आहे व तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

   याप्रसंगी बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण म्हणाले की आगामी काळात

 खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्याकडून रामोशी समाजाच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार 

असून आगामी काळात सोलापूर जिल्ह्याची सूत्रे शिवरत्न बंगल्यावरूनच हालतील यात काही शंका नाही असा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त  यांनी केला.

Post a Comment

0 Comments