नगरपरिषदेत मालमत्ता क्र. १६९७ वर असणारे "म्हाकुबाई देवालय " हे नाव कमी करून, कोट्यवधी रुपयांची मायाक्का मंदिराची जागा हडप ;
चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते उमेश मंडले यांचे आझाद मैदानात उपोषण
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला विशेष प्रतिनिधी ; सांगोला शहरातील सर्वे नंबर २४७ हा सर्वे नंबर जात इनाम म्हणून जोगू न्हनुनाथ डवरी यांना प्रदान करण्यात आला होता.
सदर सर्वे नंबर मधील जागा जोगू न्हनुनाथ डवरी यांच्या वारसांनी विनापरवाना वेगवेगळ्या नागरिकांना विक्री केली होती.
सदर सरकारी सर्वे नंबर २४७ पै. काही जागा आनंदराव गणपत काटकर यांनी खरेदी केली होती. सदर खरेदीजागे पैकी काही जागा आनंदराव गणपत काटकर यांनी वेगवेगळ्या नागरिकांना विक्री केली होती.
उर्वरीत राहीलेली जागा आनंदराव गणपत काटकर यांनी दि.२०/९/१९९४ रोजीचे दस्त क्रमांक २७६७/१९९४ ने वाटणीपत्र करून सर्वे नंबर २४७/२८/१८/१८/१/१/२ पै ३९.६१ आर व पो.ख.२८ आर अशी
पश्चिमेची जागा स्वतःसाठी (आनंदराव गणपत काटकर) व सर्वे नंबर २४७/२८/१८/१व/१/१/२ पै ५७ आर पुर्वेची सुभाष आनंदराव काटकर यांना असे वाटणीपत्र करून घेतले होते.
सदर आनंदराव गणपत काटकर यांनी वाटून आलेली पश्चिमेची ३९.६१ व पोट खराब २८ आर जागा हि संपूर्ण जागा
दि.५/२/१९९९ रोजीचे खरेदी दस्त नंबर ३३२/१९९९ नुसार भालचंद्र आनंदराव काटकर व सचिन भालचंद्र काटकर यांना विक्री केली होती.
सदर खरेदी दस्तामध्ये पुर्वेस २४७/२८/१८/१८/१अ/१अ/२/२, दक्षिणेला ; २४७/२८/१८/१८/१अ/१/२ पै, पश्चिमेला २४७/२ग/२८/३/२ग/२क/२/३ व उत्तरेला ; मिरज रस्ता अश्या चतुःसिमा देण्यात आल्या आहेत.
भालचंद्र काटकर व सचिन काटकर यांनी सदर खरेदी ३९.६१ आर व पोटखराब २८ आर क्षेत्रापैकी १५ आर क्षेत्र दि.२७/६/२००० रोजीचे दस्त क्रमांक २०४६/२००० नुसार १. मधुकर सदाशिव माळी,
२. उत्तम सदाशिव माळी, ३. सुदीप सुभाष बेले, ४. जयवंत सदाशिव माळी यांना व ५.६१ आर क्षेत्र दि.४/९/२००१ रोजीचे दस्त क्रमांक ३२५३/२००१ नुसार १. मारुती तुळशीराम बनकर,
२. बाळासाहेब महादेव एरंडे यांना विक्री केले. वरील दोन्ही विक्री केलेले खरेदी दस्त हे भालचंद्र काटकर व सचिन काटकर यांनी खरेदी केलेल्या क्षेत्रांपैकी चतुः सिमा प्रमाणे बरोबर व योग्य आहेत.
परंतु भालचंद्र काटकर व सचिन काटकर यांनी आनंदराव गणपत काटकर यांच्या कडून दि.५/२/१९९९ रोजीचे खरेदी दस्त ३३२/१९९९ नुसार खरेदी केलेल्या खरेदी दस्तामध्ये सि.स.नं.२९३७ व २९३८ मधिल जागा खरेदी केली
नसताना किंवा आनंदराव काटकर यांनाही सदर सि.स.नं.२९३७ व २९३८ मधील जागा दि.२०/९/१९९४ रोजीचे वाटणीपत्र दस्त क्र.२७६७/१९९४ नुसार मिळालेली नसताना
भालचंद्र काटकर व सचिन काटकर यांनी संगणमत करून सि.स.नं.२९३७ मधील १२.९३ चौ.मी मायाक्कादेवी मंदिराची जागा व सि.स.नं.२९३८ मधील ६.२१ चौ. मी.
रस्तापड असलेली जागा दि.११/५/२००१ रोजीचे दस्त क्रमांक १६१३/२००१ रोजी मारुती तुळशीराम बनकर व बाळासाहेब महादेव एरंडे यांना बेकायदेशीर विक्री केली आहे.
वास्तविक पाहता सदर जागेची मालकी आनंदराव काटकर यांची होती ना भालचंद्र काटकर व सचिन काटकर यांची होती.
परंतु उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचा-याच्या मदतीने सि.स.नं.२९३७ व २९३८ च्या सिटी सर्वे उता-यावर बेकायदेशीर नोंदी धरून घेतल्या आहेत.व न.पा.मालमत्ता क्रमांक १६९७ वर
असणाऱ्या म्हाकुबाईचे देवालयाची नोंद कमी करून या मालमत्ता क्रमांक १६९७ वर बाळासाहेब एरंडे व मारूती बनकर यांच्या नावाची नोंद तात्कालीन मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीर करून घेतली आहे.
तरी सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधीतांवर योग्य ती कारवाई करून सदरची मुळची सरकारी असलेली जागा सरकार जमा करण्यात यावी.
आणि सदर जागेवर महाराष्ट्र शासन अशी नोंद करण्यात यावी. या मागणीसाठी दि.१ जुलै २०२४ रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार
असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार उमेश मंडले यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात सांगोला तालुक्यातील राजकीय क्षेत्रात या प्रकरणामुळे खळबळ उडणार हे मात्र नक्की आहे.
0 Comments