उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा व नियम बाह्य चालणाऱ्या
ट्रॅव्हल्स मालकावर गुन्हे दाखल करावेत तुषार इंगळे यांची मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) - तालुक्यातून मुंबई पुणे येथे जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्सची कागदपत्राची तपासणी करावी, नियमबाह्य सुरू असलेल्या सर्व ट्रॅव्हल्स मालकावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत
व तालुक्यात वाहन तपासणी साठी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे मोबाईललोकेशन ट्रेस करून तात्काळ निलंबित करावे व सह आरोपी करावे. ही कार्यवाही तात्काळ न झाल्यास.
तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
शहर प्रमुख तुषार इंगळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यासह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सांगोला तालुक्यातून पुणे, मुंबई या ठिकाणी साधारणपणे दररोज १० ते १२ ट्रॅव्हल्स येजा करीत आहेत
यातील कांही वाहनांना परमिट नाही फिटनेस दाखला नाही. उपप्रादेशक परिवहन विभागाने ज्या वाहनाला जे वाहतूक
क्षमता प्रमाणे पासिंग आहे आहे. त्या पासिंग क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी वाहतूक केली जात आहे.
या ट्रॅव्हल्समध्ये मालवाहतूक करणे हे अजिबात कायदेशीर नसताना या ट्रॅव्हल्स मध्ये मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते
याची चौकशी करावी प्रवाशांच्या बाबतीत दर पत्रक लावली जात नाही. प्रवाशाकडून दुप्पट पैशाची आकारणी करून लूट केली जात आहे.
लुट चालू आहे प्रवाशांना दैनंदिन दरवाढ केली जाते मनाला वाटेल ते मनमानी कारभार ट्रॅव्हल्स चे मालक करीत आहे. प्रवाशांची लूट करीत आहेत.
त्यामुळे या मालकांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर तालुक्यामध्ये अनेक खडी क्रेशर मालकांची वाहने आहेत. अशा खडी क्रेशर वाहतूक करणाऱ्या वाहनांचा टॅक्स नाही इन्शुरन्स नाही.
कोणत्याच वाहनाला नंबर प्लेटा नाहीत. ५०-५० वर्षांपूर्वीची वाहने वापरली जात आहेत. त्याचबरोबर क्षमतेपेक्षा जास्त खडी भरली जाते आणि भरधाव वेगाने वाहने चालवली जातात.
याची चौकशी करून हे सर्व वाहने चौकशी करून शासनाकडे जमा करावीत. त्याचबरोबर वाळूच्या वाहनामुळे ही प्रचंड प्रमाणात अपघात होत आहेत. या कोणत्याही वाहनांना नंबर प्लेट नाहीत
त्यामुळे अपघात करून गेलेली वाहने कोणाचे आहेत ही मालकी सिद्ध होत नाही. त्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनाची उपप्रादेशिक परिवहन विभागाने पथक नेमून तपासणी करावी.
शालेय विद्यार्थी वाहतूक सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त चालू आहे. शालेय बसेसना कोणतीही कागदपत्रे नाहीत. या वाहनांची तपासणी करावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, विरोधी पक्ष नेते, परिवहन आयुक्त मुंबई, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक,
प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज यांना देण्यात आल्या असल्याची माहिती तुषार इंगळे यांनी दिली.
0 Comments