नागरिकांनो सावधान! शुटिंगच्या नावाखाली गोव्याच्या तरुणाकडून दोन महिलांची फसवणूक;
सांगोला तालुक्यातील घटना..इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
इंस्टाग्रामवरील व्हिडीओ पाहून झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन पेट्रोल पंपाच्या जाहिरातीसाठी लहान मुले
शुटिंगकरिता पाहिजेत म्हणून गोव्यातील परप्रांतीय तरुणाने दोन महिलांचा विश्वास संपादन केला.
मुलीच्या अॅडमिशनसाठी म्हणून व अल्बम साँग अडकल्याचा बनाव करून दोघींकडून सुमारे ७८ हजार ५०० रुपये उकळून त्यांची फसवणूक केली.
हा प्रकार ७ एप्रिल ते २५ जून या कालावधीत सांगोला व गोवा येथे घडला. याबाबत मुस्कान इमरान मुलाणी (रा. महूद रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संदीप पाटील (रा. गोवा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी, मुस्कान मुलाणी हिची मैत्रिणीने १५ मार्च रोजी इंस्टाग्रामवर तिने शुट केलेला व्हिडीओ अपलोड केला होता.
त्यावेळी त्याने त्याला तुम्ही पण गोवा या ठिकाणी शुट करता काय, अशी कमेंट केली होती.
या दोघींना गोव्यात नेऊन शुटिंग केली. त्यानंतर पेट्रोलपंपाच्या जाहिरातीसाठी लहान मुले लागणार असल्याचे
सांगून १०५०० रुपये फी घेतली आणि पैसे परत देताना फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments