google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! मराठा आरक्षणासंदर्भात एक महिन्यात होणार निर्णय

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! मराठा आरक्षणासंदर्भात एक महिन्यात होणार निर्णय

ब्रेकिंग न्यूज! मराठा आरक्षणासंदर्भात एक महिन्यात होणार निर्णय


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 त्यात आज मंत्री शंभूराज देसाई आणि शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली.

 यावेळी देसाई यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जरांगेंच्या आधीच्या सर्व मागण्यांवर जोमाने काम सुरू आहे. 

तसेच आचारसंहितेमुळे हे काम खंडित झाले होते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जरांगे यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, असे मानू नये. 

मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देखील देण्यात आले आहे. सगे सोयऱ्यांच्या बाबतीतही विचार होईल.

 हवे तर यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू, असे आश्वासन देसाई यांनी दिला. 

त्यावर जरांगे यांनी सरकारला 30 जूनच्या आत आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी मुदत दिली. 

अन्यथा आपण थेट राजकारणात उतरू, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments