उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांची विधान भवन मुंबई येथे समस्या
व प्रलंबित सिंचन योजना व लागणारा
निधी याबाबत मा आ दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतली भेट
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विधान भवन मुंबई येथे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष
मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी भेट घेऊन यलमार समाजाच्या व होलार समाजाच्या समस्या व मागण्या यांच्या विषयी सविस्तर चर्चा केली.
या चर्चेनंतर मा. नामदार फडणवीस साहेब यांनी या संदर्भात लवकरच बैठक लावून या समाजाच्या समस्या व मागण्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासित केले.
सांगोला तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजना व शेतकऱ्यांना दैनंदिन कार्यात विजेच्या समस्येला फार मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत आहे. विजेच्या या लपंडावी खेळीला येथील शेतकरी वर्ग त्रासून गेलेला आहे
या सर्वांचा विचार करता वीज वितरणाच्या बाबतीमध्ये असलेल्या समस्या व प्रलंबित सिंचन योजना व लागणारा निधी याबाबत ही सविस्तर चर्चा यावेळी
मा. नामदार फडणवीस साहेब यांच्याबरोबर झाली. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी ना. फडणवीस साहेब यांनी दिली.
0 Comments