सांगोला शहरातील धक्कादायक घटना.. मुलांच्या शिक्षणाच्या तणावातून सांगोल्यात पित्याची आत्महत्या
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची आर्थिक अडचण येईल, या तणावातून पित्याने राहत्या घरातील पंख्याला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना गुरुवारी रात्री ८:३०च्या सुमारास सांगोल्यात विद्यानगर येथे घडली. हरिश्चंद्र सुभाष दौंडे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.
याबाबत महेश दत्तात्रय बोत्रे (रा. त्रिमूर्ती टॉकीजसमोर, सांगोला) यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हे एका बँकेत दिवसभर शिपाई म्हणून तर रात्री एका पंपावर वॉचमनची नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
मुलांचे शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट घेत होते. पत्नी मनीषा ही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करत होती. दोन्हीही मुले उच्च शिक्षण घेत
असल्यामुळे त्यांना पैशाची अडचण येईल म्हणन हरिश्चंद मागील १५ दिवसांपासून तणावाखाली होते, असे नातेवाइकांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी रात्री ८ वाजता पत्नी मनीषा या सांगोला कोष्टी गल्लीत माहेरी आल्या होत्या. हीच संधी साधून हरिश्चंद्र यांनी घरातील छताच्या पंख्याला सुताच्या दोरीने गळफास घेतला.
रात्री ९च्या सुमारास पत्नी मनीषा माहेरून घरी आली असता घराचा दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी खिडकीतून डोकावले असता पतीने गळफास घेतल्याचे दिसले.
त्यांनी आरडाओरडा केला. नातेवाइकांनी त्यास खाली उतरून तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास पोलिस कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर करीत आहेत.
मुलगा एमबीबीएस तर मुलगी घेते लॉचे शिक्षण
मुलगा ज्ञानमूर्ती व मुलगी संजोत, असे मिळून विद्यानगरात राहतात. दरम्यान, त्यांचा मुलगा हरिश्चंद्र दौंड ज्ञानमूर्ती हा बारामती
येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असून, मुलगी संजोत पुणे येथे एलएलबीचे उच्च शिक्षण घेत आहे.


0 Comments