google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला तालुक्यात मृग नक्षत्रातील पावसाची जोरदार हजेरी माण व अफ्रुका नदीला आले पाणी

Breaking News

मोठी बातमी...सांगोला तालुक्यात मृग नक्षत्रातील पावसाची जोरदार हजेरी माण व अफ्रुका नदीला आले पाणी

मोठी बातमी...सांगोला तालुक्यात मृग नक्षत्रातील पावसाची जोरदार हजेरी माण व अफ्रुका नदीला आले पाणी


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :-  गेली चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाढेगाव येथील माण व अफ्रुका नदीला पाणी आले आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला या नद्यांना पाणी आल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे. 

मृग नक्षत्राच्या पावसाने वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव, वाकी, जवळा, कडलास या नदी परिसरातल्या गावात तसेच सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने 

या भागातील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. बऱ्याच ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहिल्यामुळे शनिवारी रात्री काही काळ वाहतूक बंद होती.

एकीकडे उन्हाळ्यात तापमान ४२ अंशाच्या पुढे गेले होते. पाऊस वेळेत पडेल का ? आणि पडला तर किती पडेल या विचारात

 असणाऱ्या शेतकरी वर्गाला जोरदार पावसाच्या आगमनामुळे सुखद हवेचा गारवा मिळाला आहे. नद्यांना पाणी आल्यामुळे आसपासच्या विहीर, आड, बोअरची पाणी पातळी वाढणार आहे.

सांगोला तालुका तसा दुष्काळी म्हणून ओळख आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस पडून या नद्यांना पाणी येते. 

मात्र यावेळेस चक्क पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदीला पाणी येणे हे कित्येक वर्षानी घडत असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. नाहीतर खरीप हंगामातील पेरण्या होणही कठीण होत होते. 

सद्या शेतातील सर्व मशागतीची कामे झाली असन पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागात वाफसा येताच पेरण्याना वेग येणार असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments