google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आगीत अॅग्रो एजन्सीचे दुकान जळाले कृषी केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी; अंदाजे ७० लाख रुपयाचे नुकसान

Breaking News

सांगोला शहरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आगीत अॅग्रो एजन्सीचे दुकान जळाले कृषी केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी; अंदाजे ७० लाख रुपयाचे नुकसान

सांगोला शहरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आगीत अॅग्रो एजन्सीचे दुकान जळाले


कृषी केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी; अंदाजे ७० लाख रुपयाचे नुकसान

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : विजेच्या बोर्डात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत कृषी केंद्रातील महागडी औषधे, बी-बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते, संगणक,

 सीसीटीव्ही कॅमेरे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ७० लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना बुधवारी मध्यरात्री १च्या सुमारास मटन मार्केट शेजारील शंभूराजे अॅग्रो एजन्सीज याठिकाणी घडली.

 याबाबत, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.

बागलवाडी (ता. सांगोला) येथील तरुण उद्योजक विशाल चेळकर यांनी नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये अॅग्रो एजन्सी या नावाने सहा महिन्यांपूर्वी कृषी केंद्र चालू केले होते.

 सध्या खरीप हंगामामुळे त्यांनी दुकानात रासायनिक खते, औषधे, बी- बियाणे कीटकनाशकाचा स्टॉक करून ठेवला होता.

 बुधवारी दिवसभर व्यवहार करून दुकान कुलूपबंद करून विशाल चेळकर घराकडे परतला.

दरम्यान, मध्यरात्री दुकानातून धूर येत असल्याचे पाहून अनोळखी व्यक्तीने बोर्डवरील मोबाईल नंबरवरून विशाल चेळकर यांच्याशी संपर्क माधला त्याने तातडीने घटनास्थली

धाव घेतली. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने एक तासाच्या परिश्रमातून आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी तहसीलदार संतोष कणसे, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची पाहणी तेली सांगोला नालका खते औफो बी-बियाणे विक्रेते संघटनेच्या वतीने शंभुराजे कृषी केंद्र

 चालक विशाल चेळकर यास तातडीची आर्थिक मदत केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान घाटुळे, उपाध्यक्ष रमेश अनुसे, माजी सरपंच तुकाराम आळसुंदकर, योगेश कुलकर्णी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments