धक्कादायक...तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून पित्याकडून मुलाची हत्या
कसारा : शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून स्वत:च्या नऊ वर्षीय मुलाच्या तोंडात वहीच्या पानाचा बोळा कोंबून त्याची हत्या करणार्या
एकनाथ गायकवाड याला कसारा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुलाच्या हत्येचे सुरुवातीला बनाव रचला होता.
तपासाअंती त्याने हत्या केल्याचे उघड झाले.
तालुक्यातील वाशाळा येथे एकनाथ गायकवाड हा राहतो. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि मुलगा युवराज राहत होता.
एकनाथ गाकवाड याला दारू पिण्याची सवय होती. घरगुती भांडणांमुळे
त्याची पत्नी चार महिन्यांपासून वेगळी राहात आहे. युवराज हा एकनाथ यांना शिवीगाळ करत असे. त्यामुळे एकनाथ यांना संताप येत होता.
सोमवारी खेळायला गेलेल्या युवराजला बोलावल्यावर युवराजने त्याला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने एकनाथ याने युवराजला घराजवळील शेतात नेले.
तिथे त्याच्या तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून त्याची हत्या केली. एकनाथ गायकवाड याला कसारा पोलिसांनी अटक केली आहे.
0 Comments