google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप, चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार

Breaking News

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप, चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप, चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार


वडील, चुलता आणि भाऊ यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

 एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्याच्या हडपसर परिसरात असलेल्या मांजरी या ठिकाणी घडली.

हा प्रकार जुलै 2022 ते 10 जून 2024 या कालावधी दरम्यान घडला. पीडित मुलीने या संदर्भात आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

 त्यानंतर वडील चुलत भाऊ आणि चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहते.

याप्रकरणी 13 वर्ष 10 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी भारतीय दंड विधान 376, 376 (आय), 323, 506, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा

 कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, चुलते, चुलत भाऊ अशा एकत्र कुटुंबात 

मांजरी मधील घुले नगर परिसरात राहायला आहे. जुलै 2022 मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत तिला एकटे गाठले. तिला 'चल प्यार करेंगे' असे म्हणाला. 

तिने त्याला नकार दिला असता लोखंडी रॉडचा धाक दाखवला. स्वतःचे आणि तिचे कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्रास झाल्यामुळे तिने आरडाओरडा सुरू केला.

 स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती तिथून पळाली. त्याने तिला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास 'ठार मारून टाकीन' अशी धमकी दिली होती.

त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये एके रात्री फिर्यादी मुलगी घरामध्ये झोपलेली होती. त्यावेळी तिचा चुलता त्या ठिकाणी आला. तिच्या अंथरुणामध्ये शिरून त्याने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला

 आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले 

आणि तिच्यावर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 अशा प्रकारे वडील तिला दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. पुढील तपास हडपसर पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments