धक्कादायक..पंढरपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत नजिक ही घटना घडली.
अपघातात जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. प्राप्त माहितीनुसाह, ही बस पंढरपूर येथून मुंबईसाठी रवाना झाली होती.
दरम्यान, यवत जवळील सहजपूर गावाच्या हद्दीत या बसचा अपघात झाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरु केले.
बस झाडावर आदळल्याने अपघात
बस अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून पलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत
मतद आणि बचाव कार्यास प्राधान्य दिले. जखमींना तातडीने जवळच्या लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बस झाडावर आदळल्याने हा अपघात घडला. या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत.
फोटो आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा पुढील भाग झाडावर आदळला. ज्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
ग्रामिण भागात एसटी प्रवासास प्राधान्य
सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रवास ही एमएसआरसीटी सची खास ओळख. पण, अलिकडी काही काळात ही ओळख
अपघात आणि बसला आग लागण्याच्या घटनांमुळे काहीशी मलीन झाली आहे. अनेकदा बसची दुरावस्ता, नव्या चालकांना आवश्यक प्रमाणात प्रशिक्षण न मिळणे,
जुन्या चालकांच्या आरोग्याच्या समस्या, समोरील वाहनचालकाची चूक, रस्त्यांची गुणवत्ता आणि रहदारी यांसारख्या अनेक कारणांमुळे बसचा अपघात होण्याचे प्रमाण वाढते आहे.
ग्रामीण भागात आजही एसटी बसचा प्रवास अतिशय सुखाचा प्रवास म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक आजही एसटी बसलाच प्राधान्य देतात.
असे असले तरी सरकार आणि प्रशासन यांच्या पातळीवर एसटीबाबत प्रचंड उदासीनता असल्याने महामंडळाची दुरावस्था झाल्याचे सांगितले जाते.
खाही प्रमाणात राज्य सरकारने खासगीकरणासही प्राधान्य दिलेले दिसते. त्यामुळे काही खासगी बसगाड्याही एसटी महामंडळाच्या ताफ्यात आरुड झाल्या आहेत.
या खासगी बसवर असणारे चालक अनेकदा कंत्राटी कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना मिळणारे प्रशिक्षण, सेवा-सुविधा यांमध्ये प्रचंड तफावत आढळते. त्यामुळेही बसचे अपघात होतात.
अनेकदा चालकांमध्ये असलेले व्यसनही अपघातास कारणीभूत ठरते. काही वेळा चालकांना मद्यपान करण्याची सवय असल्याचे आढळते. अलिकडील काळात चालकांमध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाणही वाढते आहे.
त्यामुळे रात्री उशीरपर्यंत मोबाईल हाताळत राहिल्याने त्याचा परीणाम झोपेवर होतो आहे. परिणामी दुसरा दिवसही निरुत्साहाने सुरु होतो. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत न झाल्यानेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
0 Comments