google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कराटेपटू शिवांश होनरावचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार

Breaking News

कराटेपटू शिवांश होनरावचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार

कराटेपटू शिवांश होनरावचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार


सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :-  वाघमारे सरांच्या कराटे क्लासचा विद्यार्थी शिवांश निलेश होनरावचा कोल्हापूर येथे सत्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सत्कार केला. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये

 शिवांश होनराव यांनी दुहेरी सुवर्णपदक पटकावून यश मिळविले होते. या यशाबद्दल शिवांश होनराव यांचा छत्रपती शाहू महाराज यांनी सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

शिवांश होनराव हा वयाच्या सातव्या वर्षी ब्लॅक बेल्ट परीक्षा पास असून कता गटामध्ये व कुमिते फाईट गटामध्ये उत्तम कामगिरी करत आहे 

शिवांश हा सांगोल्यातील प्रसिद्ध व्यापारी निलेश नानासाहेब होनराव यांचा मुलगा आहे आणि वाघमारे सरांकडे सध्या तो न्यू इंग्लिश स्कूल येथील मागील पटांगणावर सायंकाळी सहा वाजता प्रशिक्षण घेत आहे

 व  सिंहगड पब्लिक स्कूलचा पहिलीचा विद्यार्थी आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सत्कारावेळी   श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व  

विश्वविजय (दादा) खानविलकर व शिवांशचे वडील निलेश नानासाहेब होनराव व आई समृद्धी होनराव उपस्थित होते. त्याच्या यशाबद्दल वाघमारे सरांच्या कराटे क्लासमध्ये आनंदाचेे वातावरण आहे

Post a Comment

0 Comments