google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या प्रशासकीय व सामाजिक कार्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा - सुरजदादा बनसोडे

Breaking News

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या प्रशासकीय व सामाजिक कार्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा - सुरजदादा बनसोडे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर  यांच्या प्रशासकीय व सामाजिक कार्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा -  सुरजदादा बनसोडे


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने सांगोला भीमनगर येथील संपर्क कार्यालयात सुरजदादा बनसोडे यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास अरुण आण्णा बनसोडे, अनिल जावीर , गणेश कांबळे, चंदू मोरे , पोपट तोरणे , गुणवंत जगधने , चंद्रकांत काटेइम्तियाज मनेरी , 

फिरोज मनेरी , लकी कांबळे , बुद्धदेव बनसोडे , दिग्विजय बनसोडे , देवरत्न बनसोडे आदी कार्यकर्ते व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सुरजदादा बनसोडे आपल्या मनोगतात म्हणाले की अहिल्यामाई होळकर यांच्या प्रशासकीय व सामाजिक कामाचा 

आदर्श सर्वच जाती धर्माच्या लोकांनी घेण्यासारखा आहे 17 ते 18 व्या शतकातील त्यांचे कार्य धाडसी आणि दूरदृष्टी असणारे होते ,

 त्या पहिल्या महिला प्रशासक होऊन गेल्या की त्यांनी स्वतः शस्त्र हातात घेऊन पराक्रम ही दाखवला आणि प्रजेच्या हिताचा आणि विकासासाठी मोठे कार्य केले , त्या वेळी प्रचंड धार्मिक बंधने असताना 

सुद्धा सर्व धर्म समभाव ही संकल्पना राबवली , समता , बंधुत्व , समानता , सहिष्णुता , अस्पृश्यतेला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला , धर्मांध शक्तीचा बिमोड केला ,

 हिंदू धर्मातील अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा याला कडाडून विरोध केला , हिंदू धर्मात पती मेल्या नंतर सती जाण्याची अनिष्ट परंपरा बंद केली त्याची सुरुवात स्वतः पासून केली

 त्यांचे पती हे युद्धात मरण पावले  अहिल्यामाई होळकर यांना अवघ्या 29 व्या वर्षी विधवा व्हावं लागलं पण त्यांनी सती न जाता हातात तलवार घेऊन पराक्रम दाखवून गोरगरीब प्रजेला न्याय मिळवून दिला 

, कित्येक मंदिरे बांधली काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला , मस्जिद , दर्गा ह्या सुद्धा बांधली त्यांनी कधीही जातीवाद धार्मिक मतभेद मानला नाही , नदीवर घाट बांधणे , 

सार्वजनिक पाणवठे , रस्ते , ज्याच्या त्याच्या कलेनुसार कुवतीनुसार उद्योग धंदे उभारून दिले आता स्वतंत्र भारतात जो कारभार ससर्वजनिक बांधकाम विभागाकडून जी कामे केली जातात

 ती कामे 18 व्या शतकात अहिल्यामाई होळकर यांनी करून दाखवली त्याच अनुषंगाने हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खऱ्या जननी त्यांना म्हंटल तर वावग ठरणार नाही , 

म्हणून त्या वेळी इंग्लंडच्या विकटोरिया राणीने त्यांचे तोंड भरून कौतुक करून त्यांना अनेक पदव्या दिल्या 

म्हणून अशी महिला प्रशासक व समाजसुधारक पुन्हा होणे नाही म्हणून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वच जाती धर्मातील पुढारी , नेते राजकीय पक्षाचे आमदार , खासदार ,

 मंत्री , सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी घेतला तरच अहिल्यामाईच्या जयंतीला खरे अभिवादन असेल अशी भावना संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी व्यक्त केली

Post a Comment

0 Comments