google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील घटना! पोटच्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करून बापानेच केला खून; निर्दयी माता-पित्यांना न्यायालयाने ठोठावली फाशी

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील घटना! पोटच्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करून बापानेच केला खून; निर्दयी माता-पित्यांना न्यायालयाने ठोठावली फाशी

सोलापूर जिल्ह्यातील घटना! पोटच्या 13 महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करून बापानेच केला खून;


निर्दयी माता-पित्यांना न्यायालयाने ठोठावली फाशी

सोलापूर : पोटच्या १३ महिन्याच्या चिमुकलीवर निर्दयी बापाने नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. त्यावेळी ती ओरडत

 असल्याने त्याच बापाने पोटच्या गोळ्याचा गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी जोरदार युक्तिवाद केला.

न्यायालयाने तो ग्राह्य धरून पीडित चिमुकलीच्या माता-पित्याला फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष बाब म्हणजे अंदाजे सहा महिन्यातच या खटल्याचा निकाल लागला.

राजस्थानातील बिष्णोई दांपत्य जगण्यासाठी सिकंदराबाद येथे आले होते. त्याठिकाणी वेल्डिंगचे काम करीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. 

त्यांना एक गोंडस मुलगा व १३ महिन्यांची मुलगी झाली होती. दोन मुलांमुळे त्यांच्या घराला घरपण आले होते. सिकंदराबादमध्ये भाड्याच्या घरात राहायला असताना 

काही महिने त्यांचा संसार सुखाने सुरू होता. पण, जन्मदात्याचीच नियत फिरली आणि त्याने १३ महिन्याच्या आपल्याच चिमुकलीवर अत्याचार केले. 

विशेष बाब म्हणजे सर्वकाही जन्मदात्या मातेसमोर सुरू असतानाही तिने निर्दयी पतीला रोखले नाही म्हणून तिलाही आरोपी करण्यात आले.

अत्याचार होताना चिमुकली ओरडत होती, त्यावेळी रागाने त्या निर्दयी बापाने चिमुकलीचा गळा आवळला

 व त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन पती-पत्नीने भाड्याचे घर खाली केले व एक दिवसासाठी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले.

 धोलाराम बिष्णोई याने राजस्थानातील ओळखीच्या व्यक्तीला राजकोट- सिकंदराबाद एक्स्प्रेसचे ऑनलाइन तिकीट काढायला सांगितले. 

तिकीट कन्फर्म झाल्यावर आरोपी पती-पत्नी रेल्वे स्टेशनवर आले आणि रेल्वेत बसून सोलापूरच्या दिशेने निघाले.

'त्या' महिला प्रवाशामुळे खुनाचा उलगडा

राजकोट- सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये बसून राजस्थानच्या दिशेने प्रवास करणाऱ्या त्या निर्दयी माता-पित्यांनी लाल कापडात १३ महिन्यांची मृत चिमुकलीला गुंडाळले होते.

 समोरील सीटवर त्यांनी ती चिमुकली ठेवली होती, त्याचवेळी तेथील महिला प्रवासी आली. तिने चिमुकलीला घेण्यासाठी थोडी वादावादी झाली होती.

 त्यावेळी चिमुकलीच्या आईने तिला मांडीवर घेतले. मात्र, त्यावेळी चिमुकलीचे दोन्ही हात खाली लोंबकळत होते. तेव्हा त्या महिला प्रवाशाला त्याबद्दल संशय आला. 

लगेचच नेपाळला जाणाऱ्या त्या महिला प्रवाशाने तिकीट तपासणीसाकडे (टीसी) तक्रार केली. तोपर्यंत रेल्वे वाडीपर्यंत आली होती. प्रवाशांनी रेल्वे वाडीला थांबवली व तेथील स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. 

पण, तेथे पोलिस व वैद्यकीय तज्ज्ञ नसल्याने रेल्वे सोलापूरला नेण्यास सांगितले. तोपर्यंत त्यांनी सोलापूरच्या स्टेशन मास्तरला याची माहिती दिली होती. 

रेल्वे सोलापूर स्टेशनवर येताच त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि डॉक्टरांनी चिमुकलीला तपासले. त्यावेळी ती मयत असल्याचे स्पष्ट झाले.

नेपाळच्या प्रवासी महिलेची व्हिडिओ कॉलवरून साक्ष

मृत चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नातील निर्दयी मातापित्याचा प्रकार ज्या महिला प्रवाशामुळे उघडकीस आला, ती नेपाळची होती.

 रेल्वे पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली.

 यातील मुख्य साक्षीदार महिला नेपाळमध्ये राहायला असल्याने न्यायाधीशांसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात ३१ साक्षीदार तपासले. 

सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवून सरकारतर्फे ॲड. राजपूत यांनी आरोपींच्या फाशीची मागणी केली. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी त्या निर्दयी माता-पित्यांना फाशीची शिक्षा ठोठावली.

घटना धक्कादायक होती, आरोपींना फाशीची शिक्षा

मृत चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल, न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल, सिकंदराबाद, वाडी, सोलापूरच्या स्टेशन मास्तरांची साक्ष,

 डॉक्टरांची साक्ष, सिकंदराबादमधील घरमालकांची व ज्याच्याकडून तिकीट बुकिंग केले, त्याची साक्ष व कॉल डिटेल्स, असे सर्व पुरावे आम्ही सरकारतर्फे न्यायालयासमोर ठेवून युक्तिवाद केला.

 तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना फाशी ठोठावली. वडील पोटच्या १३ महिन्याच्या चिमुकलीसोबत असे कृत्य करू शकतो, हे खरोखर धक्कादायक होते.

- ॲड. प्रदिपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर

Post a Comment

0 Comments