धक्कादायक ! बाळाचा पुरलेला मृतदेह स्मशानभूमीतून झाला गायब, सोलापुरात खळबळ
सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत पुरलेला बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे या बाळाच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, स्मशानभूमीत पुरलेला बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना सोलापुरा घडली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका दहा दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला होता.
त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी स्मशानभूमीत पूरला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीचा विधी करण्यासाठी
या बाळाचे कुटुंब जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले. तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला.
जेव्हा नातेवाईक बाळाला पुरलेला ठिकाणी आले तिथे त्यांना फक्त खड्डाच दिसला. मात्र त्यातून बाळाचा मृतदेह गायब होता.
दरम्यान या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
0 Comments