मोठी बातमी.. इस्रायली शास्त्रज्ञ झीव चारिट यांची सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट व परीसंवाद कार्यक्रम संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/ प्रतिनिधी: इस्त्रायली शास्त्रज्ञ झीव चारिट यांनी सांगोला तालुक्यातील बंडू केदार यांच्या पेरू बागेला
व यशराज गांडूळ खत प्रकल्पला भेट दिली. तसेच सुरेश पवार यांच्या डाळिंब व केशर माती शेती फार्म चोपडी या प्लॉटला भेट दिली.
शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन डाळिंब, पेरू बागांची पाहणी केली. त्यानंतर हर्षदा लॉन्स याठिकाणी परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. लांडगेसाहेब, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे ,मंडल कृषी अधिकारी झांबरेसाहेब, सुपरवायझर चव्हाण साहेब,
नेटाफिमचे ऍग्रो नॉमिस्ट उत्तर भारत प्रमुख श्री. अरुणजी देशमुख ,रिजनल मॅनेजर श्री माळी साहेब ,एरिया मॅनेजर जट्टे साहेब,
इंजिनियर प्रज्योत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शेतकरी परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सांगोला, जत ,आटपाडी, पंढरपूर या भागातून शेतकरी उपस्थित होते.
शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांचं पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सविस्तर मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगतशील शेतकरी, युवा उद्योजक केशरमाती कृषीउद्योग या फर्मचे प्रोप्रायटर सतीश पाटील यांनी परिश्रम घेतले.
0 Comments