google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात नगरपरिषदेमार्फत मोकाट श्वानांवर नसबंदीची प्रक्रिया सुरू

Breaking News

सांगोला शहरात नगरपरिषदेमार्फत मोकाट श्वानांवर नसबंदीची प्रक्रिया सुरू

सांगोला शहरात नगरपरिषदेमार्फत मोकाट श्वानांवर नसबंदीची प्रक्रिया सुरू


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पुणे येथील श्वान पथकाकडून सांगोला शहरातील १०० मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केल्यानंतर कुत्र्यांना वॅक्सिन (लस) देऊन तीन दिवसांनी

 पुन्हा ज्याठिकाणी पकडले त्याच ठिकाणी सोडून दिल्याचे युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे डॉ. सर्वेश पटेल यांनी सांगितले.

सांगोला शहर व उपनगरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर वाढला आहे. ही भटकी कुत्री नागरिक, महिला, अबालवृद्ध, लहान मुलांवर अचानक हल्ला

 करून अनेकांना चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच दुचाकीस्वारांना कुत्री आडवी गेल्याने अपघात झाले होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा, 

अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. सांगोला नगरपरिषदेकडून पुणे येथील युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटी यांचेशी पत्रव्यवहार केला   होता. मागील आठवड्यापासून

• आतापर्यंत शंभर श्वानांवर केली नसबंदीची शस्त्रक्रिया

डायब्रर प्लस खेचर इक्राम अन्सारी यांच्या पथकामार्फत मोकाट व भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

 नगरपरिषद सर्व्हेनुसार सांगोला शहर परिसरात सुमारे ५०० भटकी कुत्री असल्याचे निदर्शनास आले आहे. 

या पथकाने आतापर्यंत सांगोला शहरात सर्वत्र फिरून सुमारे १०० मोकाट व भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदीची मोहीम उघडली आहे.

 पकडलेली कुत्री सांगोला नगरपरिषदेच्या एका हॉलमध्ये तीन दिवस ठेवली जातात. श्वानाची परिस्थिती पाहून त्याच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. त्यांना या तीन दिवसात अंडी व इतर सकस आहार दिला जातो,

 जी कुत्री आजारी आहेत अशांवर वैद्यकीय उपचार सुध्दा केले जाते आहेत. ही मोहीम महिनाभर चालणार असल्याचे इक्राम अन्सारी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments