google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ..मद्यधुंद रवीना टंडनने महिलेला केली जबर मारहाण

Breaking News

धक्कादायक ..मद्यधुंद रवीना टंडनने महिलेला केली जबर मारहाण

धक्कादायक ..मद्यधुंद रवीना टंडनने महिलेला केली जबर मारहाण


आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री रवीना टंडन सध्या एका मारहाण प्रकरणामुळे मीडियामध्ये चर्चेत आली आहे. असा दावा केला जात आहे 

की, रवीनाने एका वृद्ध महिलेसह आणखी दोन जणांना मारहाण केली आहे. या घटनेनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

 काल रात्री उशिरा मुंबईच्या वांद्रे उपनगरात तीन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप रवीनावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवीनाच्या ड्रायव्हरवर रिझवी कॉलेजजवळ कार्टर

 रोडवर निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा आणि तीन जणांना धडक दिल्याचा आरोप आहे. याविषयी लोकांनी त्याला विचारले असता, रवीना मद्यधुंद अवस्थेत तिच्या कारमधून बाहेर आली.

 आणि तिने पीडितांना शिवीगाळ, मारहाण केली. वांद्रे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने रवीनाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी या प्रकरणात फारसे लक्ष दिले नसल्याचे म्हटले जात आहे.

Post a Comment

0 Comments