मा. नगराध्यक्षा राणीताई माने व मा. नगरसेविका छायाताई मेटकरी
यांच्या हस्ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आदिती अडसूळ, वैष्णवी रणदिवे यांचा सत्कार संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला /प्रतिनिधी: सांगोला शहरातील दहावीमध्ये यशस्वी ठरलेल्या कु. आदिती संतोष अडसूळ ,
हिने सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला येथे इंग्लिश मीडियममध्ये दहावीमध्ये ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला .
तसेच वैष्णवी बाजी रणदिवे हिने सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे दहावीमध्ये ९०.६0 टक्के गुण मिळविले.
यशस्वी ठरलेल्या या विद्यार्थिनींचा माजी. लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेविका छायाताई मेटकरी यांच्या शुभहस्ते फेटा, शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संतोष अडसूळ, सुरेखा अडसूळ, तसेच बाजी रणदिवे, अर्चना रणदिवे, शरद रणदिवे, अमित रणदिवे, हणमंत रणदिवे ,शहाजी रणदिवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments