google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आंबेडकरी समाजाला भावनिक करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना त्यांची जागा दाखवणार:- सुरजदादा बनसोडे

Breaking News

आंबेडकरी समाजाला भावनिक करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना त्यांची जागा दाखवणार:- सुरजदादा बनसोडे

 आंबेडकरी समाजाला भावनिक करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना त्यांची जागा दाखवणार:- सुरजदादा बनसोडे 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला:-घेरडी येथे 2 दिवस झालेल्या पावसामुळे दलित वस्तीत पाणी साचून ते पाणी प्रत्येक घरात पाणी शिरल्याने 3 दिवस लोकांना घरातील पाणी घालवणे कठीण झाले होते


 मला ज्यावेळी घेरडीतील दलित समाज बांधवांनी फोन करून कळवले तेव्हा मी स्वतः जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता 


ग्रामपंचायत त्या ठिसूळ व भ्रष्ट कारभारा मुळे हा प्रकार घडला होता चुकीच्या पद्धतीने बंदिस्त गटार केल्यामुळे हा प्रकार घडला आहे 

दुसरे दुर्दैव दलित समाज 2 ते 3 दिवस पाण्यांत होता प्रत्येक घरात कंबरे इतके पाणी साचल्याने राहायचे कुठे अशी अवस्था निर्माण झाली होती 

तरी तालुक्यातील आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांना तिकडे जायला भेट घेऊन सांत्वन करायला वेळ मिळाला नाही 

हे दुर्दैव , भावी आमदार , फिक्स आमदार , जनतेच्या मनातील आमदार म्हणवून तालुक्यात मिरवून घेणाऱ्यांचे दलित समाजवरचे प्रेम आणि आस्था दिसून येते

 , तालुक्यातील दलित समाजाने ह्यांचा डाव वेळीच ओळखून घ्यावा , ह्यांच सामाजिक कार्य म्हणजे वाढदिवसाला शुभेच्छा देणे

 , लग्नाला भेटणे , एखाद्याचा सत्कार करणे, एवढेच पण दलित समाजाच्या अडी अडचणीला येत नाही 

तकी जर आंबेडकरी समाजावर येणाऱ्या अडीअडचणी वेळी इतर नेते मंडळी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त भावनिक करत असतील

 तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत ह्यांची दुकानदारी चालू देणार नाही म्हणून मी स्वतः सामाजिक बांधीलकी म्हणून जाऊन भेटून त्यांचे सांत्वन केले 

म्हणून मी नगरसेवक व रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चा संस्थापक अध्यक्ष सुरजदादा बनसोडे तालुक्यातील दलित बांधवांना विनंती करतो

 की स्वार्थी व दिखाव्याची आपुलकी दाखवणाऱ्या नेत्यांना ओळखून पुढची दिशा ठरवावी

Post a Comment

0 Comments