google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात अवकाळीचा तडाखा ! घरांवरील पत्रे उडाले, वीज पडून जनावरे दगावली; घराची भिंत पडून कुटुंब बचावले

Breaking News

सांगोला तालुक्यात अवकाळीचा तडाखा ! घरांवरील पत्रे उडाले, वीज पडून जनावरे दगावली; घराची भिंत पडून कुटुंब बचावले

सांगोला तालुक्यात अवकाळीचा तडाखा ! घरांवरील पत्रे उडाले, वीज पडून जनावरे दगावली; घराची भिंत पडून कुटुंब बचावले


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सुसाट वाहणारे वादळी वाऱ्याचा सांगोला तालुक्यातील नवीन लोटेवाडी, मानेगाव , नरळेवाडी, तरंगेवाडी, हंगिरगे, नाझरे आदी गावांना जोरदार तडाखा बसला असून, अनेक घरांवरील पत्रे उडून गेले.

आंबा, केळी, डाळिंब फळांबरोबर शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. हंगिरगे, तरंगेवाडी, नवी लोटेवाडी येथे वीज पडून दोन जर्सी गायी, एक म्हैस व सहा कोंबड्या ठार झाल्या. 

अनेक ठिकाणी विजेचे खांब, शेतातील डीपी (रोहित्र) पडून तारा तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, रविवारी रात्री ८ वाजता 

सांगोला तालुक्यातील ९ मंडलनिहाय मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून, सरासरी २७.४ मिमी पाऊस झाला असून, शेतकरीवर्गातून आनंदाचे वातावरण आहे.

सांगोला शहर व तालुक्यात मागील १५ दिवसांपासून वादळी वारे व अवकाळी पाऊस, वीज कोसळण्याच्या घटनांमुळे हाहाकार उडाला आहे. 

रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर सुसाट वाहणाऱ्या वादळी वारे व मान्सूनपूर्व पावसात नरळेवाडी येथील सदाशिव ज्योती ढेंबरे, विष्णू सदाशिव ढेंबरे, 

नवीन लोटेवाडी येथील संजय दगडू लवटे, नानासाहेब पांडुरंग लवटे यांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले, 

तर नवी लोटेवाडी येथील सुखदेव शंकर सावंत यांच्या घराची भिंत पडली. मात्र, कोणालाही दुखापत पोचली नाही.

तसेच नाझरे येथील संभाजी सदाशिव बनसोडे यांच्या गट नंबर ३०२/२ मधील ०.६० हेक्टर आंब्याच्या बागेचे नुकसान झाले, हंगिरगे येथील नितीन संभाजी साबळे यांची गाय वीस पडून ठार झाली. 

तरंगेवाडी (बंडगर वस्ती) येथील बाळू मारुती बंडगर यांची म्हैस व ६ कोंबड्या वीज पडून ठार झाल्या. 

नवी लोटेवाडी येथील श्रीमंत ज्ञानू जावीर यांच्या गावठाण हद्दीत घरासमोर वीज पडून जर्सी गाय मृत पावली.

 हणमंतगाव (घुले वस्ती) येथील दुर्योधन रंगनाथ घुले यांचे पॉलिहाऊस शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगोला तालुक्यात ९ मंडलनिहाय पाऊस

सांगोला तालुक्यात ९ मंडलनिहाय मान्सूनपूर्व झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे- सांगोला- १२.८, शिवणे-२२.५, जवळा-३३.८, हातीद-३७, सोनंद-३४.८,

 महूद-८.५,कोळा-२३.३, नाझरे-६०.८ व संगेवाडी-१२.८ एकूण सरासरी २७.४ मिमी पाऊस झाल्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments